समस्येच्या गर्तेत

हिमायतनगर(अनिल मादसवार)एकेकाळी नावारूपाला आलेली व भरमसाठ विद्यार्थी संख्या असणारी जिल्हा परिषद हायस्कूल गत काही वर्षापासून समस्येच्या गर्तेत आले असून, शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

दिवसेंदिवस हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाची दुरवस्था होत असून, यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे हिमायतनगर शहरातील एके काळी अत्यंत नावारूपाला आलेली जिल्हा परिषद हायस्कूल म्हणजे विलक्षण शाळा असा नावलौकिक होता. शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थी संख्या, शिक्षकांचे विद्यार्थ्यांवरील संस्कार अगदी वाखण्यासारखे, शाळेची टुमदार इमारत, भव्य खेळाचे मैदान व शाळेतील शिस्त अगदी सगळ्या बाबी कौतुकास्पद होत्या. परंतु मधल्या काळात सदरील शाळेची अत्यंत दुरवस्था झाली असून, जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये प्रवेश मिळावा म्हणून धडपडणारे पाला व विद्यार्थी आता शाळेच्या दुरवस्थेमुळे प्रवेश घेणे तर सोडाच इकडे ढुंकूनही पाहिनासे झाले आहे. सतत पालक व शिक्षकांच्या वादात असणारी हि शाळा शेवटच्या घटका मोजत असून, शहरातील खाजगी शिक्षण संस्थांकडे विद्यार्थी व पालकांचा काळ वाढू लागला आहे.

शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीत समन्वय नसल्याने येथे अनेक वाद निर्माण होत असून, त्याचा परिणाम खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव हायस्कूल मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊन मोठ्या प्रमाणात नुकास्न होत आहे. मुख्याध्यापकाच्या हेकेखोर एकाधिकार शाहीला कंटाळून व शिक्षकांच्या उप - डाऊन मुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आयचा घो... होत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासह अनेक पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकार्याकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.

यात शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका न घेणे, शाळा नियमित वेळेवर न भरविणे, अर्ध्या शाळेतून शिक्षकांची दांडी मारणे, एस.एस.ए.चे अनुदान ११-१२ पासून मंजूर झाले नाही, गणवेशाचे काम व्यवस्थापन समितीला न सांगता परस्पर देऊन निकृष्ठ आणने, आर.एम.एस.ए.अनुदानाची रक्कम व बालभवनाचा निधी धूळखात ठेवणे, मराठी व उर्दूच्या पहिली ते दहावी पर्यंत असून, माध्यमिक मराठी आठवी ते दहावी वर्गास एकाच शिक्षक, सहा महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची, शौच्चालाय व्यवस्था नाही, पटसंख्या केवळ ८० टक्क्यावर ठेवणे, खोल्या अपुर्या दुरुस्त केल्या तर एकच सत्रात सर्व शाळा भरविता येईल, शिक्षक मुख्यालाई न राहता नांदेडहून रेल्वेने ये -जा करणे, या शाळेवरील शिक्षक प्रतिनियुक्तीवर तीन वर्षापासून अन्यत्र ठेवणे, अल्पसंख्यांक प्रोत्साहन भत्ता अनियमितता ठेऊन जमा - खर्चाचा हिशोब देण्यास टाळाटाळ करणे आदींसह अनेक समस्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. यावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेमूद खान दाउदखान, उपाध्यक्ष शरद चायल, सदस्य नसरीन बेगम अ.सलाम, शबाना बेगम शे.रऊफ, सय्यद अब्दुल जलील, जफर महमद खान, खालेदा खानम फेरोज खान, शे.जामीन शे.अल्लाबकश, अ.अजीज शे.गफूर, फेरोज खान महेमूद खान, सुमित्रा केरबा गायकवाड आदींसह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी