कोल्हापूरची महालक्ष्मी

हिमायतनगरात अवतरली कोल्हापूरची महालक्ष्मी



हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील गणेश चौकात स्थापन करण्यात आलेल्या विश्वकर्मा दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दि.२६ शुक्रवार पासून मंडळाच्या पेंडलमध्ये शेकडो महिला मुलीनी दुर्गा सहस्रनाम जपात सहभाग घेतल्याने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. यंदा युवकांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रूपातील मूर्ती स्थापन केल्यानी महिला भक्तांची वर्दळ वाढली आहे. 

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील विश्वकर्मा दुर्गा मंडळाच्या युवकांनी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना दि.२५ च्या रात्री पुरोहीत्याच्या मंत्रोच्चार वाणीत केली आहे. या वर्षी उत्सव आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने साजरा केला जानार असून, त्यासाठी युवकांनी कोल्हापूरच्या मातेची हुबेहूब मूर्ती स्थापित करून भक्तांना आकर्षित करण्यासाठी परीश्रम घेत आहेत. आगामी दहा दिवसाच्या उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम घेतले जानार आहेत. दि.२६ शुक्रवार ते दि.०४ शुक्रवार पर्यंत दुर्गा सहस्त्रनाम जप सकाळी ०९ वाजेदरम्यान सुरु आहे. दि.२६ रोजी दुपारी ०३ वाजता महिला मुलींसाठी भव्य रांगोळी स्पर्धा. दि.२७ शनिवारी शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा सायंकाळी दुपारी ०३ वाजता, संगीत खुर्ची स्पर्धा सायंकाळी ०९ वाजता, दि.२८ रविवारी रात्री ८.३० वाजता फ़ैन्सि ड्रेस स्पर्धा तथा फैशन - शो, दि.२९ सोमवारी रात्री ८.३० वाजता हास्य खळखाळट विंडो वीर हास्य सम्राट श्री सिद्धार्थ खिल्लारे यांचा कार्यक्रम, 

दि.३० मंगळवारी सायंकाळी ७ वाजता वाद विवाद स्पर्धा - लोकशाहीत मतदान करावे कि नाही या विषयावर वयोगट ११ वि ते पदवीधर विद्यार्थी - विद्यार्थिनीसाठी, दि.०१ बुधवारी सायंकाळी ८.३० वाजता डान्स कॉम्पिटेशन (संक्स्कृतिक) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.०२ गुरुवारी सकाळी ६ वाजता दुर्गाष्टमी महायज्ञ व भव्य महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. दि.०३ शुक्रवारी रात्री ८.०० वाजता परमेश्वर मंदिर मैदानात ४५ ते ५० फुटी भव्यदिव्य रावणाचे दहन बजरंग दल शाखेच्या वतीने करण्यात येणार आहे. दहा दिवसाच्या उत्सवाच्या पर्वकाळात दुर्गा मातेच्या मूर्तीची महाआरती दररोज सायंकाळी ०८ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

तसेच दि.०४ रोजी दुर्गा मातेची भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात येउन मूर्ती विसर्जनाने उत्सवाचा समारोप केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी पार पडलेल्या विविध कार्यक्रमातील विजेत्यांना मातेच्या मूर्तीची प्रतिमा व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती पंकज बंडेवार, गजानन मांगुळकर, गजानन चायल, गोपी डोईफोडे, अंकुश चर्लेवार, नितीन भूसावले, यांनी दिली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी