धोकादायक इमारत

विघ्नहर्त्याच्या मिरवणुकीत येणारे भिंतीचे विघ्न दूर
धोकादायक इमारत पडण्याचे काम सुरु 


हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रथम पूजनीय श्री गणपत्ती बाप्पाचे विसर्जन शांततेत व्हावे यासाठी अडसर ठरणारी धोकादायक इमारत पाडावी अशी मागणी शांतता कमेटीच्या बैठकीत गणेश भक्तांनी केली होती. सदर मागणी लक्षात घेता हिमायतनगरचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी संबंधित घरमालकास सूचना देताच इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यामुळे गत दोन वर्षापासून होत असलेली गणेश भक्तांनी मिरवणुकीतील अडथळे दूर होणार आहेत. 

गत वर्षी शांतता कमेटीच्या बैठकीत धोकादायक इमारतीचा प्रश्न समोर आल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधिकारी श्री तानाजी चिखले यांनी प्रत्यक्ष जयमोक्यावर जाऊन मिरवणुकीत अडथळा ठरणारी धोकादायक इमारतीची पाहणी केली, तसेच रहद्दारीस अडथळे ठरणारे रस्त्यावरील ठिकाण तातडीने मोकळे करण्याच्या सूचना तत्कालीन पोलिस निरीक्षक सोनवणे व ग्रामसेवक गर्दसवार यांना दिल्या होत्या. परंतु ग्रामपंचायत व पोलिसांचे प्रयत्न त्यावेळी वायफळ ठरले होते. दरम्यान अल्पशः पावसाने इमारतीची भिंत डगरून वाटसरू वाहनधारकांना अडथळे निर्माण झाले होते. सुदैवाने यात कोणालाही नुकसान झाले नसले तरी सदरची इमारत अजूनही जैसे थे च अवस्थेत होती. त्यामुळे यावर्षीच्या शांतता कमेटीच्या बैठकीत गणेश भक्तांनी पवणेकर यांच्या धोकादायक इमारतीचा प्रश्न लाऊन धरला होता. या मागणीची दखल घेऊन शिस्तप्रिय पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या प्रयत्नांतून विघ्नहर्त्याच्या मिरवणुकीत येणारे भिंतीचे विघ्न दूर झाले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी