चोरट्यांचा धुमाकूळ.

हिमायतनगर(वार्ताहर)शहरासह तालुका परिसरात मागील आठ दिवसातून भुरट्या चोरात्यासह बैलजोडी व म्हशी सह इतर जनावरे चोरांनी धुमाकूळ माजविला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

पावसाळा सुरु होऊन सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांसह सामान्य जनता हैराण आहे. मात्र यात जनावरे चोरट्यासह भुरट्या चोरांनी धुमाकूळ माजविल्याने जनतेला अडचणीचा सामना करावा लागत आहे. मागील १५ दिवसाच्या काळात हिमायतनगर, रेणापूर, सरसम, करंजी, यासह तालुक्यात बैलजोड्या, म्हैस, यासह अन्य जनावरे चोरून नेल्याच्या सहा घटना घडल्या आहेत. हा प्रकार उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे यांच्या निदर्शनास शांतता कमेटीच्या बैठकीत शेतकरी व जागरूक नागरिकांनी आणून दिला आहे. मात्र अद्यापही चोरट्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. आता तर घरफोडी व भुरट्या चोरट्यांनी आपले जाळे पसरविले आहे. शहरतील बजरंग चौक, काजी मोहल्लासह अन्य भागात दि ०५ व ०६ च्या रात्री भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. उष्णतेमुळे बाहेर झोपलेल्या नागरिकांच्या घरात घुसून नगदी रक्कम व चिल्लर साहित्य लांबविले जात आहे. याप्रकारामुळे शहरातील नागरिकत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व प्रकार पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्षामुळे घडत असून, त्यांची रात्रीची गस्त कमी झाल्याचा फायदा चोरट्यांना होत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. या प्रकाराकडे नुतन पोलिस निरीक्षक श्री स्वामी यांनी लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.

तर तालुक्यातील सरसम येथे दि.०६ च्या रात्रीला अज्ञात चोरट्यांनी प्रजावाणीचे पत्रकार दत्ता शिराने यांच्या घरीच डल्ला मारला असून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने पळविले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून, वृत्त लिहीपर्यंत चोरीचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

याबाबत पोलिस निरीक्षक रमेश स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, आज शहरातील सर्व भागाची माहिती घेण्यासाठी मी स्वतः पाई फिरलो आहे. नागरिकांची सुरक्षा बंदोबस्तासाठी लवकरच पथक स्थापन करून शहरवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. नागरिकांनी सतर्क राहून वेळीच घटनेची माहिती पोलिसांना द्यावी.नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस स्थानकात आम्ही आहोत, करिता कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही, याकामी सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी