हवेत गोळीबार

हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील काही दिवसापासून दुधड जंगलात अवैद्य रित्या सागवानाची कत्तल करून तस्करी केली जात होती. हि बाब समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व कर्मचार्याचे पथक सागवानाचा साठा जप्तीची कार्यवाहीसाठी जंगलात फिरत होते. यावेळी दोन बैल गाड्यातून सागवानाची तस्करी होताना त्यांनी पकडून जप्त करून घेऊन येत होते. याच वेळी अचानक तस्करांच्या अन्य साथीदारांनी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला चढविला. तस्करांच्या हल्ल्याला प्रतीउत्तर देताना त्यास अधिकारी श्री वाकोडे यांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. हि घटना दि.०५ जुलै रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली. यास घाबरून तस्कर मुद्देमाल सोडून फरार झाले असून, एकूण ०१ लाख रुपये किमतीचे सागवान जप्त करण्यात आल्याची माहिती वनपाल बनसोडे यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवर मोठे जंगल आहे. मागील अनेक वर्षापासून या जंगलात आंध्रप्रदेशातील लाकूड तस्कर साकीय आहेत. हि बाब मागील महिन्यात वनपाल यांच्या सतर्कतेने उघड झाली होती. मात्र जवळ काही नसल्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले होते. गत काही महिन्यापूर्वी नव्याने पदभार स्वीकारलेले वन परीक्षेत्रापाल अधिकारी श्री.एस.बी.वाकोडे यांनी संबंधित विभागाच्या वनपाल व कर्मचार्यांना घेऊन सागवान तस्करी व कत्तल झालेल्या परिसराचा आढावा घेण्यासाठी दि.०५ रोजी दुधड बीटमधील सर्वे नंबर २३९ परिसरात पिंजून काढला. याच भागात सागवान तस्करांनी जाळे पसरून सागाच्या झाडांची कत्तल करून ठेवले होते. तोच माल काही दिवसानंतर वाळल्यावर सालपट काढून नेण्यासाठी दोन बैल गाड्यात सागवानाचे नग भरून जात असताना रंगेहात पकडले. मात्र त्यांनी बैलासह गाड्या सोडून तेथून धूम ठोकली. शनिवारी १० वाजता घडलेल्या घटनेनंतर जंगल परिसरात तोडण्यात आलेली सागवानाची जप्ती व तपासणी पंचनामा अधिकारी, वनपाल व कर्मचार्यांनी सुरु केला असताना अचानक तस्करांच्या अन्य १० ते १५ साथीदारांनी वनकर्मचार्यावर जीवघेणा हल्ला चढविला. त्यांच्या हातात कुर्हाडी, लाठ्या काठ्या व अन्य हत्यारे असल्याने बचावासाठी व तस्करांना पिटाळून लावण्यासाठी अखेर अधिकार्याने हवेत गोळीबार केला. तरी देखील तस्कर माघारी फिरत नसल्याचे पाहून त्याने तीन गोळ्यांच्या फैरी हवेत झाडताच तस्कर सागवानाचा मुद्देमाल सोडून पसार झाले. या कार्यवाहीत वन कर्मचार्यांनी साढेचार घनमीटर सागवान लाकडाचे ४६ नाग व दोन बैलगाड्या असा एकूण ०१ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिमायतनगर चे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.एस.बी.वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागवान जप्तीची कार्यवाही वनपाल बनसोडे, शिंदे, वनकर्मचारी यांनी करून मुद्देमाल भोकर येथील डेपोत जमा केला आहे. याबाबतची माहिती नांदेड येथील उपवनरक्षक डोडल यांना कळविण्यात आली आहे. मागील दोन वर्षानंतर हिमायतनगर तालुक्यात वनविभागाच्या कर्मचार्याने दाखविलेल्या या धाडसा बद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मागील महिन्यात याच भागात दोन वनपाल व काही वन कर्मचार्यांनी सागवान तस्करांच्या बैलगाड्या पकडल्या होत्या. मात्र त्यांच्याकडील हत्यारे व हल्ल्यामुळे अधिकारी -कर्मचारी कार्यवाही कण्यास धजावत नव्हते. नुकतेच वन अधिकारी व कर्मचार्यांना शास्त्र चालविण्याची माहिती व परवानगी देण्यात आल्याने हि धाडसी कार्यवाही करण्याचे बळ मिळाले अशी माहिती वनपाल श्री शिंदे यांनी दिली आहे.

एकूणच वन अधिकार्यांनी केलेली हि धाडसी कार्यवाही कौतुकास्पद असली तरी आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरील वाशी, पवना, दरेसरसम, दुधड- वाळकेवाडी, दाबदारी, दरेगाव, टाकराळा यासह सीमेवरील जंगल परिसरात आंध्रप्रदेशातील लाकूड तस्करांनी जाळे पसरविले आहे. यामुळे जंगलातील किमती सागवान, खैर, धावंडा, दुधी, सिसम यासह अन्य गहीच्या झाडांची मोठ्याप्रमाणात तस्करी केली जात आहे. यामुळे जंगल भकास होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या तस्करीला आळा घालण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी