महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी

हिमायतनगर(अनिल मादसवार)पंचायत समिती कार्यालयाच्या सभाग्रहात येणाऱ्या प्रत्येकाने महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कानबा पोपलवार बोलत होते. ते पत्रकारसंघाच्या वतीने वसंतराव नाईक यांची जयंतीचे औचित्य साधून डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या हस्ते भारताला संविधान अर्पण करत असतानाची प्रतिमा प.स. कार्यालयास भेट देण्यात आली, त्या प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर प.स.सभापती वानारव वानखेडे, सदस्य लक्ष्मीबाई भवरे, बालाजी राठोड, अडेलाबाई हातमोडे, पंडित रावते, गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या शुभ प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, पंचायत समितीच्या भव्य सभाग्रहात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा मुख्य उद्देश म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येकाने महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काय करावे. समाज हितासाठी, देश हितासाठी आयुष्य वेचणार्या महापुरुषांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतल्या जाणार्या या सभाग्रहात थोर पुरुषांचे चित्र पाहून विचार परिवर्तनास मदत होईल. आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिसराम घेऊन निर्माण केलेले संविधान तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलम आजाद या लोकनेत्यांना व भारत देशाला अखंड ठेवण्यासाठी सुपूर्द करत असतानाची दिलेली प्रतिमा सभाग्रहात येणाऱ्या पत्येकास प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती सदस्य,विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर यांनी पत्रकारांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी कक्ष अधिकारी गणेश शिवरात्री, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, धम्मपाल मुनेश्वर, ज्ञानेश्वर पंदलवाड, संजय मुनेश्वर, सुभाष गुंडेकर, वसंत राठोड, रवि राठोड, सोपान बोम्पीलवार, मारोती वाडेकर, प्रवेश दवणे, आनंद ढगे आदींसह मोठ्या प्रमाणात कर्मचारी बांधव, पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष दत्ता शिराने यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी अधिकारी संजय लहाने यांनी मानले.

वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
या कार्यक्रमाच्या तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसतंरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणि पंचायत समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी येथील कृषी व्यापारी, नागरिक, शेतकरी, पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी पुंडलिक माने यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी