लग्नसराईची धूम

हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढती महागाई व नापिकीमुळे सर्व सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. खरीपाचा हंगाम अतिवृष्टीने वाहून गेला, रब्बीचा हंगाम गारपिटीने नेला. अश्या अवस्थेत आर्थिक घडी कशी बसवावी या विवंचनेत सर्वसामान्यांची गोची झाली आहे. परंतु काहीही झाले, कितीही मोठी संकटे आली तरी लग्न घटिका हि निभाऊन न्यावीच लागते. तशीच अवस्था या वर्षीची झाली असून, यातही वाढत्या महागाईला बाजूला सारून सध्या तरी लग्नसराईची धूम जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

हिंदू रीतिरीवाजाप्रमाणे वर हा लग्नाअगोदरच्या पूर्व संध्येला म्हणजे हळदीला वधू मंडपी पोहोंचतो, त्याच्यासोबत करवली, सकोन्या व अन्य खास पाहुणे मंडळी असतातच. त्या सर्वांची चांगली सोय करून, विधिवत व वाजत गाजत नवरदेवाची वरात काढून लग्न लावणे व भोजनासह पार्टीने पाठविणे हा सव खर्च वधूच्या पित्याला सहन करावा लागतो. हे सर्व तर ठीक मात्र सध्या वरच्या मिरवणुकीत सामील होऊन धम्माल करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, यासाठी मग ट्रकसारख्या वाहनाच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करण्यास माघार घेत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास पहावयास मिळत आहे.

खाजगी म्हणी प्रमाणे नवरदेव जातो नवरीसाठी ..वऱ्हाड जाते पोटासाठी... वधुपित्याकडून वऱ्हाड मंडळीच्या जेवणावळीची खास सोय केली जाते. परंतु महागाईने कळस गाठल्याने वाधुपित्यांचे कंबरडे मात्र मोडत आहे. त्यातच कायद्याने हुंडा देणे- घेणे बंदी असताना सुद्धा हि प्रथा अजूनही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शासकीय नौकरीत असलेल्या नवरदेवाचे भाव तर गगनाला भिडले आहे. शेतकरी कुटुंबातील वारांचा भाव तर एकरी एक लाख असा झाला असून, सालगड्याची मागणी अर्ध्या लाखावर गेली आहे. यामुळे लग्नाची मुलगी असलेल्या पित्याची चांगलीच फटफजिती होत असून, कायद्याने हुंड्याची प्रथा कमी होत नसल्याने या बाबत जागरूक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तेंव्हा सर्वांनी मिळूनच या हुंड्याच्या प्रथेला लगाम लाऊन खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सामुहिक विवाह मेळाव्यात सहभागी होऊन वधू पित्यांना दिलासा देणे व हुंडा बंदीची जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी