महायुती उमेदवार प्रचार कार्यालायचे उद्घाटन ....

राजसिंहासनावर नरेंद्र मोदी सारखे व्यक्तिमत्व विराजित करण्यासाठी
भेद - भाव विसरून कामाला लागा - चव्हाण
महायुती उमेदवार प्रचार कार्यालायचे उद्घाटन ....


हिमायतनगर(अनिल मादसवार)आमची लढाई हि गरीब आणि श्रीमंत अशी आहे, काँग्रेस चे उमेदवार ज्या कळमनुरी तालुक्याचे आहेत. त्यांच्याच मतदार संघात शिवसेनेचे १० जी.प.सदस्य आहेत. खुद्द त्यांच्याच घराण्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती हि शिवसेनेची आहे. ते खुद्द आपल्या मतदार संघातील सत्ता टिकऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी दिवा स्वप्ने पाहणे सोडावे. मला तिकीट न मिळाल्याने मी नाराज आहे अशी अफवा काँग्रेस मधील काही जन पसरून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असून, विरोधकांची हि लाचार चालबाजी आहे, अश्या वाभाड्या उठविणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांना मी ठणकाऊन सांगतो कि, मी महायुतीचे नुसते कामच नाही तर, हिंगोली लोकसभा मतदार संघातील ४५० वाडी - तांड्यावर जावून मला मिळालेल्या मतापेक्षा दुप्पटीने मतदान खा. सुभाष वानखेडे यांना मिळून देवून स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास सार्थ करून दाखविण. आगामी काळात राजसिंहासनावर नरेंद्र मोदी सारखे व्यक्तिमत्व विराजमान करण्यासाठी भेद - भाव विसरून श्री वानखेडे यांना मताधिक्याने निवडून आणून पुन्हा संसदेवर पाठऊ असा दृढविश्वास श्री बी.डी.चव्हाण यांनी बोलून दाखविला.यावेळी खा.सुभाष वानखेडे, संघटक बी.डी.चव्हाण, शिवसेनेचे युवा नेते तथा हदगाव - हिमायतनगर विधानसभेचे संभाव्य उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम, पप्पू माळोन्दे, विजय नरवाडे, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, डॉ.प्रकाश वानखेडे, भाजपचे तालुका प्रमुख गजानन तुप्तेवार, भाजप तालुका सरचिटणीस डॉ.प्रसाद डोंगरगावकर, सुधाकर पाटील, कृ.उ.बा.संचालक बाळू चवरे, राजीव बंडेवार, विजय वळसे, जफर भाई, सत्यव्रत्त ढोले, यल्लप्पा गुंडेवार, नजीरबाबा, विठ्ठलराव वानखेडे, यांच्यासह शिवसेना, भाजपा, रीपाई, शेतकरी संघटनेसह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

प्रथम नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील शिवालय या इमातीच्या गाळ्यात दि.०३ गुरुवारी हिंगोली लोकसभा मतदार संघातील महायुती उमेदवार प्रचार कार्यालयाचे उद्घाटन येथील व्यापारी श्री महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी बोलताना जेष्ठ शिवसैनिक श्री विजय नरवाडे म्हणाले कि, मागील १५ वर्ष हदगाव - हिमायतनगर विधानसभेचे आ. सुभाष वानखेडे होते. त्यांच्या कारकिर्दीत मतदार संघात एकही खून झाला नाही. पण सध्या निवडणून आलेले काँग्रेसचे आ. माधवराव जवळगावकर यांच्या कार्यकाळात मात्र भादिवसा एका कॉंगेसच्या कार्यकर्त्याने दलित महिलेला ट्रेक्टर खाली चिरडून निर्मम हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे तर हदगाव - हिमायतनगर राज्य रस्त्यावरील सातशिव मारोती फाटा, पंजाबनगर येथे एका शिक्षक दाम्पत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्यात आले. हीच कॉग्रेसची संस्कृती आहे काय..? असा प्रश्न विचारून नरवाडे यांनी काँग्रेसच्या भ्रष्ठ नीतीवर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना मताधिक्याने निवडून देऊन नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्याचे आवाहन केले.

यावेळी मागील काळात शिवेनेवर नाराज होऊन अपक्ष प.स.निवडणुकीत निवडून आलेले, दुधड प.स.गणाचे प.स.सदस्य बालाजी राठोड व चंदू नाईक वाशीकर यांनी शिवसेनेची भगवी दस्ती घालून रीतशीर प्रवेश केला. यावेळी बोलताना श्री राठोड म्हणाले कि, राजकारी काँग्रेस हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे, अश्या वेळी स्वग्रही परत येणे हेच योग्य वाटले. डॉक्टर बी.डी.चव्हाण यांच्यासह आमचा बंजारा समाज आपल्या पाठीशी उभा आहे. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य मिळून देण्यासाठी मतदारामध्ये जनजागृती करून, गद्दार कॉंगेसला पाणी पाजवित निवडून आणून खा. वानखेडे यांना मात्रीपदावर विराजमान करू असा ठाम विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांचे आभार नागेश पाटील यांनी मानले यावेळी बोलतना ते म्हणाले कि, सत्ताधायांच्या भ्रष्ठ कारभाराच्या विरोधात हा संघर्ष आहे. पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकून नरेंद्र मोदी यांचे हाथ बळकट करण्यासठी एकदिलाने महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी गाव -गावात संपर्क साधून नागरिकांचे मत परिवर्तन करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी साईनाथ धोबे, साहेबराव वानखेडे, हनुसिंघ ठाकूर, साहेबराव चव्हाण, रामदास रामदिनवार, रमेश गुड्डेटवार, रामू नरवाडे, विलास वानखडे, अनिल भोरे, विठ्ठल पार्डीकर, गणेश पाटील, विशाल राठोड यांच्यासह शेकडो शिवसैनिक, नागरिक, पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी