बोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात

आचारसंहितेला केराची टोपली दाखून शहरात विकासाची कामे सुरु...
बोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात....

हिमायतनगर(वार्ताहर)लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगर आचारसंहितेच्या नियमन बगल देत एका ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गुत्तेदाराणे निकृष्ठ तथा बोगस मटेरियल वापरून काम करीत असल्याची तक्रार याच भागातील काही नागरिकांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यावरून वृत्त प्रकाशित होताच गुत्तेदाराचे धाबे दणाणले असून, या कामाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. परंतु संबंधितानी त्या कामाची पाहणी जायमोक्यावर जाऊन न करताच कार्यवाही गुलदस्त्यात ठेवून बिल काढण्याचा खटाटोप सुरु केला आहे. या कामाची गुणनियंत्र मापक मशीनद्वारे चौकशी करून बोगस काम करणार्याची देयके थांबवावी अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर ग्रामपंचायती अंतर्गत शहरात ०१ कोटी ०५ लक्ष रुपयाच्या निधीतून विविध वार्डात सिमेंट रस्ता व मजबुतीकरणाचे कामे निवडणुकीच्या धामधुमीत जोरात सुरु आहेत. सदरची कामे मिळविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीत कार्यरत पांढर्या वेशातील गुत्तेदाराणी टक्केवारी देवून कामे पदरात पडून घेतली आहेत. त्यामुळे शासनाची लाखो रुपायची कामे हि अर्ध्या किमतीत करून रातोरात मालामाल होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निकृष्ठ दर्जाच्या कामावरून दिसून येत आहे.

यापैकी पोलिस कॉलनी जी.प.शाळा ते जुनी जिनिंग फैक्टरी या ५ लक्ष रुपयाच्या रस्त्याच्या कामास ऐन आचारसंहितेच्या काळात सुरुवात करण्यात आली असून, या कामात विहिरीचा मुरुमाड हिरव्या रंगाचा दगड, निकृष्ठ दर्जाचे सिमेंट व माती मिश्रीत रेतीचा वापर, कुरिंग केली जात नाही. त्यावेळी येथील काही नागरिकांनी गुत्तेदारास निकृष्ठ साहित्य वापण्यास विरोध केला. सांगूनही ऐकत नसल्याने अखेर त्यांनी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडे रीताशीर तक्रार दिली. तरी सुद्धा संबंधितानी सदर गुत्तेदाराला अभय देवून काम पूर्णत्वास नेवून मार्च एंड पूर्वी बिल काढण्याचा प्रयत्न अभियांत्याशी मिलीभगत केली आहे. या बाबतचे वृत्त वर्तमान पत्रातून प्रकाशित होतच संबंधितांचे धाबे दणाणले असून, वरिष्ठांनी या कामची चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

याबाबत पंचायत समितीचे शाखा अभियंता बसीद आली यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले. कि, तक्रार कर्त्यांचा फोन आला होता, लवकरच जावून चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी