आचारसंहितेला केराची टोपली

आचारसंहितेला केराची टोपली दाखून शहरात विकासाची निकृष्ठ कामे सुरु...

नांदेड(प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या आमदारांनी नारळ फोडण्यावर भर दिला देवून, उद्घाटन, भूमिपूजन करून, विकास कामाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविण्यावर जोर दिला आहे. परंतु बहुतांश विकास कामाचे नारळ फोडून वर्षानुवर्ष लोटली ती कामे अजूनही जैसे थेच असून, नव्याने उपलब्ध झालेल्या निधीची कामे आचारसंहितेच्या नियमन बगल देत गुत्तेदार करवी सुरु आहेत. हा आचार संहितेचा भंग नव्हे काय...? असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. विकास कामाचा दिखावा करून मते मिळविण्याची धडपड सत्ताधारी पुढार्यांकडून केली जात असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्र व सामान्य नागरीकाच्या चर्चेतून पुढे येत आहेत.

तालुक्याचा कारभार सांभाळल्या पासून मागील चार वर्षाच्या काळात एवढे नारळ कधीही फोडले नाही. तेवढे नारळ ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका दिवसात ७ ते १० ठिकाणचे नारळ फोडून उद्घाटन, शुभारंभ करून कामाला सुरुवात केली आहे. उद्घाटनानंतर लगेच ०५ मार्च रोजी राज्यभरात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली. परंतु नांदेडला राहून दलाली करणाऱ्या त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी गुत्तेदारी घेतलेल्या गुत्तेदाराकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी वसूल केली अश्या प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर काही गुत्तेदाराने दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुत्तेदारांकडून जाहिरातीच्या नावाखाली लाखो रुपये उधळून शासनाच्या निधीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यास एक प्रकारे चालना दिली आहे. या मध्ये अधिक तर हदगाव -हिमायतनगर शहरातील जवळच्या दलाल कार्यकर्त्यांचा समावेश असून, मंजूर कामातून टक्केवारी काढली जात असल्याने रस्ते विकास कामाची पुरती वाट लागत आहे. परिणामी नुकत्याच झालेल्या कामावर अल्पावधीत खड्डे पडून पाणी साचु लागलेल्या कामाच्या दर्जावरून स्पष्ठ होत आहे. हा सर्व प्रकार वरिष्ठ स्तरावरून निधी खेचून आणणाऱ्या विद्यमान आमदार महोदयांना माहित असताना ईश्त्याकच्या दलाली कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याच गोटातील काहींच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत होऊन नुकसानदाई ठरेल अश्या संतप्त प्रतिक्रिया अंतर्गत गटबाजी करीत असलेल्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीला आणखीन आठ ते नऊ महिन्याचा कालावधी शिल्लक असून, आत्तापासूनच विधासभेची तयारी जवळगावकर यांनी केल्याचे दिसत आहे. केवळ उद्घाटने करून कोट्यावधीचा निधी खेचून आणल्याचे दाखवून सामान्य जनतेची मने वाल्विण्याबरोबर मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला कि काय..? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार निवडून येवो अथवा न येवो आपली आमदारकी मात्र टिकली पाहिजे या विचाराने हा सर्व खटाटोप केला जात असल्याचे आरोप विरोधी पक्षातून केला जात आहे.

मागील २० दिवसापूर्वी शहरात ०१ कोटी ०५ लक्ष रुपयाच्या निधीतून विविध वार्डात सिमेंट रस्ता व मजबुतीकरण कामाचे उद्घाटने करण्यात आली. हि कामे आपल्यालाच मिळावी म्हणून यथील ग्रामपंचायत सदस्यानि गुत्तेदारी करण्यावरून ओढा-ताण सुरु केली होती. म्हणून हि कामे आदर्श आचारसंहितेपूर्वी सुरु होऊ शकली नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर १० दिवसांनी कामे सुरु झाली असून, यापैकी पोलिस कॉलनी जी.प.शाळा ते जुनी जिनिंग फैक्टरी या रस्त्याच्या काम सध्या सुरु आहे. या कामात विहिरीचा मुरुमाड हिरव्या रंगाचा ठिसूळ दगड, ढक्कन नावाच्या कंपनीचे निकृष्ठ दर्जाचे सिमेंट व माती मिश्रीत रेतीचा वापर केला जात आहे. सदर रस्त्याचे काम हे एका ग्राम पंचायत सदस्या कडून केले जात असून, मागील निवडणुकीत झालेला खर्च भरून काढण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची क्यूरिंग व कामाचा दर्जा अंदाजपत्रकानुसार केला जात नसून, पाच लाख रुपयाच्या निधीचे काम अर्ध्या किमतीत रातोरात पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यमुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून मार्च एंड पूर्वी बिल काढण्याचा प्रयत्न अभियंत्याच्या संगनमताने गुत्तेदाराने सुरु केला आहे. याचा अंदाज लागताच काही ग्रामस्थांनी सदर रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु कामाची चौकशी तर सोडा साधी पाहणी सुद्धा या महाशयांनी केली नाही, उलट संबंधिताने गुत्तेदाराला अभय देवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परिणामी अल्पावधीतच रस्त्याच्या कामाची वाट लागून मोठ - मोठे खड्डे पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकाराकडे निवडणूक आयोग व बांधकाम खात्याने लक्ष देवून आचारसंहितेच्या काळात विकास कामे करून निवडणूक आयोगाच्या सूचनेला केराची टोपली दाखून आचारसंहितेचा भंग तर केला जात नाही ना..? अशी शंका नागरिकांच्या तोंडून व्यक्त होत आहे.

शहरात सुरु असलेल्या कामाबाबत ग्राम विकास अधिकारी आडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, मिळालेल्या तक्रारीवरून अभियंता श्री बसीद यांना कळविले आहे. ते उद्याच या कामाची पाहणी करणाय आहेत. सध्या सुरु असलेले काम हे अगोदरच मंजूर झाले असल्याने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न गुत्तेदार करीत आहे. याच्या अधिक माहितीसाठी अभियंत्याशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला. पंचायत समितीचे अभियंता श्री बासीद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने, या कामांना आळा बसावा म्हणून खासदार, आमदार यांच्या विकास निधीबाबतच्या सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव, योजना अंमलबजावणी विभागाचे सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या भागातील लोकसभा, राज्यसभेचे सदस्य यांचा निधी वितरित करू नये. त्याचबरोबर निवडमूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषदेचे आमदार यांचा विकास निधी नव्याने वितरित करू नये, अशा सूचना निवडणूक आयोगाने कळविले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशामुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या व करू पाहणाऱ्या कामांचे काय..? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असताना मात्र संबंधितांकडून आचार संहितेच्या सूचनेला झुगारून कामे केली जात असल्याने हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय..? असा प्रश्न सामन्यांमधून विचारल्या जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी