कॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल

कॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल

पोलीस जनसंपर्क कार्यालया तर्फे दिल्या जाणाऱ्या बातम्या अनेकदा शिळ्या आणि चुकीच्या असतात.ए.सी बी. ने एखाद्या भ्रष्ट कार्मचार्यास लाच घेताना पकडले असेल तर ही बातमी बहुतेक वर्तमान पत्रात आल्यावर दुसरे दिवशी पोलीस प्रेस नोट मध्ये येते असे अनेकदा घडले आहे.उदाहरणार्थ आज दि.२० मार्चची प्रेस नोट बघा: शेतातील नापिकी व कर्जबाजारीमुळे गळफास घेऊन मृत्यु :-  किंवा 6)
लाच स्विकारताना मिळुन आला  या बातम्या आज दि.२० रोजी शिळ्या करून दिल्या आहेत.
 आजच्या बहुतेक दैनिकात आणि नांदेड न्यूज लिव्ह मध्ये कालच आलेल्या  चुकीची नावे आणि चुकीच्या बातम्या देण्यात जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी वर्गाचा हातखंडा आहे.

कालच्या प्रेसनोट मध्ये एखाद्या एका विवाहितेच्या झोपेचा फायदा घेवून तिच्या शरीरावर हात फिरवऱ्याविरूद्ध उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी देण्यात आली होती.  नांदेड प्रत्यक्षात असा गुन्हा उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  घडलाच नाही . तरीही आज 19 मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये दिलेल्या बातम्यांमध्ये क्रमांक वर उमरी पोलिसांनी महिलेल्या विनयभंगाचा प्रकार घडल्याची बातमी आहे.यात 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पवनाळा (वरचा) ता.माहूर या गावात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती घरात झोपली असतांना याच गावातील रमेश मोतीराम जाधव याने तिच्या झोपेचा फायदा घेवून तिच्या अंगावरून हात फिरवला.तिला जाग आली तेव्हा कुणास सांगू नको असे म्हणून तो पळून गेला. असे नमूद करून 
या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 23 /2014 कलम 54 (अ) (1) (2), 506 भादंविप्रमाणे दाखल केला असून तपास पोलिस हवालदार आत्राम  करीत असल्याचे पोलिसांच्या पे्रसनोटमध्ये नमूद केले होते. काल उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा नंबर 26 व 27 हे आपसातील भांडणामुळे दाखल झाले होते. आणि ती बातमी लिहिली होती त्यामुळे शंका आली आणि याची विचारणा उमरी पोलिस ठाण्यात केली असतांना 23नंबरचा गुन्हा निमटेक या गावात घडला असून तो मारहाणीबाबत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर हा गुन्हा माहूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली. 

फिर्यादी पोलीस झाला आरोपी!

सोडून असे अनेक गलथान प्रकार पोलिस अधीक्षकांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू आहेत.काल दि.१९-रोजी  वजीराबाद पोलिस ठाण्यात तलवार घेवून फिरणाऱ्या सुनील महाबोळे यास पकडले होते.त्यांची तक्रार पोलिस कर्मचारी सुशील कुबडे यांनी दिली होती.पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये सुनील प्रभाकरराव कुबडे हाच आरोपी असल्याचे नमूद केले आहे.आणि तशाच बातम्या प्रसार माध्यमांना इमेलने पाठविल्या होत्या.मराठी भाषेचे जेवढे खून पाडता येतील तेवढे खून या कार्यालयामधील कर्मचारी पाडत असतात .चुकीच्या बातम्या देणार्या या विभागातील कर्मचारीवर्गामुळे पत्रकारांनी शहानिशा न या विभागाने पाठविलेली बातमी जशीच्या तशी दिली तर नाह्कच संपादक आणि पत्रकारांवर खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून बदनामी केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो त्यामुळे प्रेस नोत्च्या बातम्या  साठी डोकेदुखी ठरली आहे.

मराठी भाषेची हत्या

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रेस नोट मध्ये मराठी भाषेतील शब्द न वापरता उर्दू फारशी भाषेतील शब्द वापरले जातात ,व्याकरण ,आणि भाषेची शुद्धता ही कधीच पाळली जात नाही.आज दिनांक २० मार्च रोजी आलेल्या प्रेस नोट मधील हे परभाषेतील रंगीत शब्द बघा  पहिलीच बातमी बघा

­पोलीस अधीक्षक कार्यालयनांदेड दिनांक : 20/03/2014

1) आकस्मात मृत्यु :-
मुक्रामाबाददिनांक 01/03/2014 रोजी 15.15 वाचे सुमाराससरकारी दवाखाना लातुर येथेयातील मयत आशा नरसिंग कसलेवय 30 वर्षेराहणार गुंडोपंत दापका ही 95%भाजल्याने मरण पावली वगैरे डॉशेखसरकारी दवाखाना लातुर यांनी दिलेल्या खबरीवरुन पो.स्टेमुक्रामाबाद आकस्मात मृत्यु नंबर 04/2014 कलम 174 सिआर.पि.सीप्रमाणे आमृ.दाखल असून तपास पोहेकॉ/243 गुडसुरकर हे करीत आहेत.

२ शेतातील नापिकी व कर्जबाजारीमुळे गळफास घेऊन मृत्यु :- 
  माहुरदिनांक 19/03/2014 रोजी 14.00 वाचे सुमारासफिर्यादीचे राहते घरीयातील मयत अनिल प्रेमसिंग आडेवय 32 वर्षेराहणार जांझी हा आई,मुलाबाळासह एकत्रित राहत होता त्याचे आईचे नावे तीन एकर शेती असुन अतिवृष्टी मुळे पुराने पाण्याने शेताचे रब्बी हंगाम हे हरभरा गव्हु हे पेरले असता गारपिठीमुळे नुकसान झाले या नापिकीमुळे व आईच्या नावे असलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे या काळजीने त्याचे राहते घरी गळयाला साडीने बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केलीवगैरे सुनिल प्रेमसिंग आडेवय 24 वर्षेधंदा शेतीराहणार जांझी तामाहुरयांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टेमाहुर आकस्मात मृत्यू नंबर 03/2014 कलम 174सिआर.पि.सी.प्रमाणे आमृदाखल असून तपास पोहेकॉ7/759 मडावी हे करीत आहेत.


प्रेस नोट मधील अपघातात मरणारी व्यक्ती नेहमीच चालकाच्या भरधाव वेगाने वाहन चालविल्यानेच मरते जो मारतो त्याची चूक कधीच नसते म्हणजे प्रेस नोट लिहिणारे जो मारतो त्याला  कधीच  दोषी धरत नाहीत न्यालायाच्या आधीच वाहनचालकास दोषी ठरवून मोकळे होतात.कदाचित एखाद्या अपघातात निकालानंतर वाहन चालक   निर्दोष मुक्त होऊ शकतो हे प्रेस नोट लिहिणारे कधीच मान्य करणार नाहीत.अपघात कुठेही घडो त्यात अपघात कसा घडला याचे वर्णन हमखास चालकाने आपल्या ताब्यातील टिपर हे हयगयीनेनिष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून सायकल ला जोराची धडक देवुन गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभूत झाला.असेच असते. यात एकही शब्द इकडे तिकडे होत नाही कारण प्रत्येक बातमीत वस्तुस्थिती लिहायची तर वेगळ्या शब्दात ते बातमी टाईप करावी लागेल त्या पेक्षा कापीपेस्टचे तंत्र वापरणे सोपे जाते म्हणून अपघात झाला की एकाच पद्धतीने वर्णन येते.दि.२०   तारखेच्या या प्रेस नोट मध्ये क्रमांक तिची बातमी बघा  3) भरधाव वेगात वाहन चालवून धडक देवून मरणास कारणीभूत झाला :- मुखेड- दिनांक19/03/2014 रोजी 13.30 वासुमारासमुखेड येथील बा-हाळी नाक्याजवळयातीलमयत नारायण मसनाजी यडगुलवारवय 40 वर्षे

हा आज रोजी त्याचे मुलाचे लग्न पत्रिका वाटप करण्यासाठी मुखेड शहरात बा-हाळी नाकेयाजवळ असतांना यातील ऍटो क्रमांक एमएच. 26 जी. 3125 चे चालकाने आपल्या ताब्यातील टिपर हे हयगयीनेनिष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून सायकल ला जोराची धडक देवुन गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभूत झालावगैरे फिर्यादी रामु नारायण यडगुलवारवय 21 वर्षेधंदा मंजुरी राहणार देवी गल्ली धर्माबाद यांनीे दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टेमुखेड गुरनं 31/2014 कलम 279, 304 ()भादंवि कायदाप्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ/1133 पेदे करीत आहेत.

आणि याच प्रेस नोट मधील क्रमांक दहावरील बातमी बघा दोन्हीचे शीर्षक सारखेच आहे आणि अपघातात मरण पावाणारास वाहन चालकाने सारखेच मारले आहे. 10)भरधाव वेगात वाहन चालवून धडक देवून मरणास कारणीभूत झाला :- विमानतळ -दिनांक 19/03/2014 रोजी 11.30 वासुमारासमाळटेकडी गुरुद्वारायातील मयत मोतीराम तुकाराम मुरमुरे,वय 53 वर्षे,व्यवसायनौकरी , राहणार आबानगर नांदेड हानौकरीसाठी जाण्याकरीता माळटेकडी गुरुद्वार्यासमोर ऍटोची वाट पाहत रोडवर उभा असतांना यातील अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हे हयगयीनेनिष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून  मयतास जोराची धडक दिली डोक्यास गंभीर मार लागुन मयताचे मरणास कारणीभूत झाला वगैरे फिर्यादी रामकृष्ण मोतीराव मुरमुरेवय 28 वर्षेव्यवसाय-शेती राहणार मौ.माळ सावरगाव ता.हदगाव,हल्ली मुक्काम आबानगर सांगवी (बुनांदेड यांनीे दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टेविमानतळ गुरनं 37/2014 कलम 279, 304 ()
भादंवि कायदाप्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ/848 सुर्यतळ करीत आहेत.

 4) फसवणुक केली :-
    अशी बातमी असेल तर तीत पुढे हिरव्या शाईत लिहिलेल्ला मजकूर सारखाच असतो फरक फक्त रकमेचा असेल बाकी वर्णन जवळपास सारखेच असते.मुदखेड-


सन 2009 ते दिनांक 19/03/2014 पावेतो (वेळ नक्की नाही), तामुदखेड अंतर्गत दरेगाववाडी माळक्ोठा चिकाळापिंपळकौठादरेगांव येथेयातील आरोपी 1)डीपीराठोड व इतर 05 जणसर्व राहणार मुदखेड यांनी संगनमत करुन पंचायत समिती मुदखेड येथे शासकीय काम करीत असतंाना शासनाच्या विविध योजना पर्यावरणग्रामसभेची योजनातंटामुक्ती अभियानस्वच्छालय प्रोत्साहन अनुदान ग्रामपंचायत कर वसुल अंगनवाडी क्रमांक 04  05 BRGF सौरपंप दिवे स्वच्छता अभियान इयोजनावर विकास कामासाठी शासना कडुन मोठया प्रमाणवर निधी प्राप्त झाल्याने आरोपीनी रक्कम हडप करणे उद्देशाने कोणत्याही प्रकारची कामे न करता कामे झाल्याची खोटी व बनावट दस्ताऐवज तयार करुन व अभिलेख तयार करुन व त्या बनावट खोटया कागदपत्राच्या आधारे एकुण 39,73,287/- रुचा अपहार संगनमताने शासनाची व जनतेची फसवणुक करुन रक्कम हडप करतांना अन्यायाने विश्वासघात केला वगैरे फिर्यादी दत्तात्रय पांडुरंग आनंतवारवय 49 वर्षेधंदा शेतीराहणार कवाना ताहदगांव यांनी दिलेल्या फिर्याद व जेएमएफसीकोर्ट मुदखेड येथील कलम156 (3) सीआरपीसीवरून पोस्टेमुदखेड गुरनं 31/2014 कलम 420, 406, 409, 467, 468, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि नांदे हे करीत आहेत.
 पुढील दारू पकडल्याच्या बातम्या बघा त्यात आकडे  व अन्य तपशील बदलेल पण ठराविक असा जांभळ्या रंगाचा मजकूर सेम असतो.
 5) बेकायदेशिररीत्या देशी दारु बाळगुन मिळून आले :- (हदगांवदिनांक19/03/2014 रोजी 20.30 वाचे सुमारासनांदेड ते हदगांव जाणारे रोडवर साई गोदावरी धाब्यातयातील आरोपी बंडु आनाजी इंगळेराहणार पिंगळी  याने बिनापरवाना बेकायदेशिररीत्या विदेशी दारु मास्टर ब्लँड चे 17 सिलबंद बॉटल किंमती2,295/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरे फिर्यादी सपोउपनि आनंद प्रभाकरराव जोंधळेयांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो.स्टेहदगांव गुरनं 07/2014 कलम 65 (मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पोना/1988 मानेकरहे करीत आहेत खालील दारू पकडण्यात आल्याच्या बातम्या बघा यात जांभळ्या शाईत दिलेला मजकूर सर्वच बातम्यात सारखाच आहे.

(कोंडलवाडीदिनांक 19/03/2014 रोजी 15.30 वाचे सुमारासनला गल्ली कोंडलवाडी येथेयातील आरोपी सलिम नवाबसाब पठाणराहणार शेवाळा   याने बिनापरवाना बेकायदेशिररीत्या देशी भिंगरी संत्रा दारु 700 एमएलच्या चे 228सिलबंद बॉटल किंमती 38,304/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरे फिर्यादी सपोनि प्रल्हाद चंदरराव सुर्यवंशीयांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टेकोंडलवाडी गुरनं 15/2014 कलम 65 (मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पोउपनि थेरेहे करीत आहेत.
() विमानतळ - दिनांक 19/03/2014 रोजी 15.00 वा. चे सुमारास,मौ.संागवी सिद्धार्थ नगर , आरोपीचे घरी , यातील आरोपी रमेश ग्यानबा शिंदे  , वय33 वर्षे,राहणार सिद्धार्थ नगर सांगवी (खु.) याने बिनापरवाना बेकायदेशिररीत्या देशी भिंगरी संत्रा दारु 180 एमएलच्या चे 24 सिलबंद बॉटल किंमती 1,080/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरेफिर्यादी पोकॉ/1381 बोडके यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. स्टे. विमानतळ गुरनं5/2014 कलम 65 () मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास नापोकॉ/1760 गुट्टेहे करीत आहेत.
() नांदेड ग्रामीण - दिनांक 19/03/2014 रोजी 13.30 वा. चे सुमारास,वसरणी येथे,आरोपीच्या घरी , यातील आरोपी 1)श्रीमती सुमनबाई शंकरराव गजभारे ,वय 45 वर्षे (2) राजु शकंरराव गजभारे दोघे राहणार वसरणी ता.जि.नांदेड यांनी बिनापरवाना बेकायदेशिररीत्या देशी भिंगरी संत्रा दारु 180 एमएलच्या चे 120सिलबंद बॉटल किंमती 5,400/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरे फिर्यादी पोहेकॉ/1027 शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं 14/2014 कलम 65 () मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पाहेकॉ/1701 वाघमारेहे करीत आहेत.
 () नांदेड ग्रामीण - दिनांक 19/03/2014 रोजी 16.55 वा. चे सुमारास,बळीरामपुर येथील आरोपीच्या घरी , यातील आरोपी 1) रावसाहेब जळबाजी डोईबळे,वय 50 वर्षे, 2) संभा दगडू हारकर , वय 62 वर्षे, दोघे राहणार बळीरामपूर ता.जि.नांदेड यांनी बिनापरवाना बेकायदेशिररीत्या देशी भिंगरी संत्रा दारु 180 एम.एलच्या चे 288 सिलबंद बॉटल किंमती 12,960/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरे फिर्यादी पोहेकॉ/1999 कुंडगिर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं 16/2014 कलम 65 ()मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पाहेकॉ/240 राठोडहे करीत आहेत.
 () नांदेड ग्रामीण - दिनांक 19/03/2014 रोजी 18.20 वा. चे सुमारास,बळीरामपुर येथील आरोपीच्या घरी , यातील आरोपी 1) संतोष ऊर्फ पप्पु किशन खिल्लारे, राहणार बळीरामपूर ता.जि.नांदेड यांनी बिनापरवाना बेकायदेशिररीत्या देशी भिंगरी संत्रा दारु 180 एमएलच्या चे 144 सिलबंद बॉटल किंमती 6,480/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरेफिर्यादी पोहेकॉ/1999 कुंडगिर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं17/2014 कलम 65 () मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पाहेकॉ/1461 बेद्रेहे करीत आहेत.
7) बेकायदेशिररीत्या हातभट्टीची दारु बाळगुन मिळून आले :- (मुक्रामाबाद-दिनांक 19/03/2014 रोजी 16.45 वाचे सुमारासमौसावळी येथेयातील आरोपी बडप्पा नागप्पा अर्जुनेवय 43 वर्षेधंदा शेतीराहणार सावळी तामुखेड याने बिनापरवाना बेकायदेशिररीत्या हातभट्टीची गावठी दारु 27 लिटर किंमत 1,080/- रु.चे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरेफिर्यादी पोना/2367 मोहन निळकंट माडपलेयांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे.मुक्रामाबाद गुरनं 18/2014 कलम 65 (मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पोना/2367 माडपलेहे करीत आहेत
() मुक्रामाबाद- दिनांक 19/03/2014 रोजी 18.30 वा. चे सुमारास, मौ.हंगरगा येथील आरोपीचे घरासमोर, यातील आरोपी मसना सिधराम कांबळे, वय 65वर्षे, धंदा शेती, राहणार मौ. हंगरगा याने बिनापरवाना बेकायदेशिररीत्या हातभट्टीची गावठी दारु 10 लिटर व 50 लिटर मोह रसायन असा एकुण 1,400/- रुचे मालाची जादा दराने अवैध विक्री करण्याचे उद्ेशाने बाळगुन मिळुन आली वगैरे फिर्यादी पोना/2367 मोहन निळकंट माडपलेयांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. स्टे. मुक्रामाबाद गुरनं 19/2014 कलम 65 () मुंबई दारुबंदी कायदाअन्वये गुन्हा दाखल असून तपास पोना/2367 माडपलेहे करीत आहेत.
प्रेस नोट मधील लाच घेताना पकडला ही बातमी कधीही घडलेली  असो तीत पुढील  मजकूरलाचेची मागणी करुन लाचेची रक्कम तहसिल कार्यालय परिसरातील भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्रात स्विकारुन त्यांना मिळणारे कायदेशीर परिश्रमिका खेरीज पारितोषिक म्हणुन 6,000/- रुलाच स्विकारुन स्वतआर्थिक फायदा करुन घेतला वगेरेसेम टू सेम असतो
6) लाच स्विकारताना मिळुन आला :- मुखेडदिनंाक 19/03/2014 रोजी 11.15वाचे सुमारासतहसिल कार्यालय मुखेड परिसरातयातील मुळ तक्रारदार श्रीराजेंद्र कांबळेयांचे नावे मौजिरगा गट क्रमांक 39 मध्ये असलेले एक हेक्टर 22 आर शेती पैकी 61 आर शेती त्याचे पत्नीचे नावे करण्यासाठी यातील आरोपी दिगांबर बाळासाहेब देशमुखवय 25 वर्षेधंदा तलाठीराहणार चिकाळा तामुदखेडहल्ली मुक्काम बेळीभर यांचे वाडयात लोखंडे चौक मुखेडयांनी 6,000/- रुलाचेची मागणी करुन लाचेची रक्कम तहसिल कार्यालय परिसरातील भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्रात स्विकारुन त्यांना मिळणारे कायदेशीर परिश्रमिका खेरीज पारितोषिक म्हणुन 6,000/-रुलाच स्विकारुन स्वतआर्थिक फायदा करुन घेतला वगेरे फिर्यादी पोलीस उपअधीक्षक मोहम्मद गुलाब साब पठाणलाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडयांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टेमुखेड गुरनं 05/2013 कलम 13(1) (लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 व कलम 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोलीस उपअधीक्षक पठाण हे करीत आहेत.

समजा घरफोडीची बातमी असेल तर तीत रकमेचा तपशील वगळता  फिर्यादी राहते घरी,यातील फिर्यादी हा त्याचे घरास कुलुप लावुन बाहेर गावी गेला असता कोणीतरी अज्ञात चोरटयांनीत्याच्या घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन कपाटाचे कुलुप तोडुन सोने चांदीचे दागिने किंमती 1,88,000/- रुव नगदी 1,500/- रुअसा एकुण1,89,500/- रुचा माल चोरुन नेला वगैरे हा मजकूर कधीच बदलत नाही .दररोजच पोलीस प्रेस नोट चा असा पंचनामा करता येईल पण त्यात वेळ घालणे व्यर्थच ठरणार आहे.पोलीस अधीक्षक बदलतात पण प्रेस नोट लिहिणारे  बहुदा कधीच बदलत नाहीत आणि बदलेले तरी ते त्यांची भाषा कधीच बदलत नाहीतखरे तर आज काल बी.जे. एम.जे झालेले कितीतरी पदवीधर बेकार हिंडत आहेत.पोलीस  खात्याची प्रतिमा चांगली व्हावी असे पदवीधर पोलीस खात्यात जनसंपर्क अधिकारी पदावर नेमले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.किंवा संबन्धित अधिकाऱ्यास अशी पदवी किंवा पदविका घेण्यास सांगता येईल किंवा नांदेड शहरातील एखाद्या पत्रकारास कंत्राट पद्धतीने या कामासाठी  येऊ शकते.नवे पोलीस अधीक्षक आणि नव्याने बदलून आलेले वरीष्ट अधिकारी असे कालानुरूप बदल करतील तर तो नवा नांदेड पॅटर्न ठरू शकेल.हे बदल करावेत अशी सर्वच पत्रकारांच्यावतीने आम्ही मागणी करीत आहोत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी