जनावरांच्या डॉक्टरांचे वागणेही जनावरासारखे...
संतप्त शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
संतप्त शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कळस झाला असून, १५ दिवसापासून आजारी असलेल्या गाईच्या वासरास अजूनही वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात डॉक्टरांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत असून, जनावरांच्या डॉक्टरांचे वागणेही जनावरासारखे झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त शेतकर्यांनी बोलून दाखविल्या.
याबाबत सविस्तर असे कि, हिमायतनगर येथील शेतकरी संतोष गाजेवार यांच्या गाईचे तीन महिन्याचे वासरू गात १५ दिवसांपासून आजारी आहे. वासराची प्रकृती ठीक व्हावी या उद्देशाने गाजेवार यांनी वासरास पाशी वैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ येथे उपचारासाठी १५ दिवसापूर्वी दाखल्केले. सुरुवातीस सदर वासरास जंत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी बिराजदार यांनी सांगून उपचार केले. परंतु उपचार नंतरही वासरास गळा सुजणे, मान टाकणे, चारा न खाणे, अशक्तपणा अश्या अनेक आजाराने ग्रासून टाकले. १५ दिवसापासुन उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजाराचे निदान होत नसल्याने सदरील डॉक्टरांच्या तज्ञ पण विषयी शेतकर्यांनी शंका उपस्थित केली असून, हे " जनावरांचे डॉक्टर कॉलीफाईड आहेत कि, सरटीफाईड " असा सवाल सुज्ञ नागरीकातून विचारला जात आहे. जनावरांच्या डॉक्टरांचे वागणेही जनावरासारखेच हाय बॉ...! असे उद्गार शेतकऱ्यांच्या तोंडून निघत आहे.
येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी एकच असून, डॉक्टर व कर्मचारी मुख्यालई न राहता नांदेड सारख्या ठिकाणाहून अप डाऊन करीत असल्याने आजारी पडलेल्या जनावरांना (पशूना) उपचारासाठी तासंतास ताटकळत बसावे लागते. रेल्वेच्या वेळा पत्रकानुसार पशु वैद्यकीय दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टर व कर्मचार्यांना मुख्यालाई राहण्याची सक्ती करण्यात यावी. आणि अधिकच गंगावलेल्या शेतकऱ्यांची कुचंबना करणाऱ्या सरटीफाईड डॉक्टरांची उचलबांगडी करावी व तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
१५ दिवसापासून उपचार करूनही वासराची प्रकृती ठीक झाली नसल्याने सदरील डॉक्टर महाशयांनी वासरास नांदेड येथे रेफर करण्याचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या तर वरिष्ठ पातळीवरून सल्ला मागून पशुधन विकास अधिकारी बिराजदार यांनी आपल्या ज्ञानाची प्रचीती दिल्याचे दिसून येते आहे.
पशुधन विकस अधिकारी बिरादार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, निदान करूनही आजार बळावत असल्याने नांदेड येथे रेफर केल्याचे सांगितले.
याबाबत शेतकरी गाजेवर म्हणाले कि, डॉक्टरांनी योग्य उपचार केले नासल्याने शेतकऱ्यांच्या पशुधांवर संक्रात येत असून, त्यांनी केलेला उपचार हा असमाधानकारक आहे. डॉक्टरांनी पशूना नांदेड येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला हा कितपत योग आहे असा सवालही त्यांनी केला.
याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर गोहात्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, अधिकार्याने स्थानिकला राहून शेतकर्यांना सेवा देत नसल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी प्रशासकीय प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीस बोलतना दिली.