एड्सबाधित व्यक्तीच्या उपचारात होमियोपॅथी उपयुक्त ठरू शकेल: डॉ मुकेश बत्रा -NNL

रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासह शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा घडवते 


मुंबई|
एड्सबाधित व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते यामुळे अशा व्यक्तीच्या संसर्ग व इतर आजारांशी लढण्याची क्षमतेवर परिणाम होतो. डॉ. बत्राजचे संस्थापक आणि चेअरमन पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा सांगतात एचआयव्हीग्रस्त किंवा एड्सबाधित व्यक्तींच्या उपचारांमध्ये लक्षणीयरित्या उपयुक्त ठरू शकेल अशी वैद्यकीय उपचार प्रणाली म्हणजे होमियोपॅथी. ती रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते आणि त्यांच्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणते. होमियोपॅथी औषधे (जसे की सायफिलिनम, सल्फर, आर्सेनिक लॉडम, सिलिका, ट्यूबरक्युलिनम, केली कॉर्बोनिकम, कॅलकेरीयालॉडम , बेसिलिनम, आर्सेनिक अल्बम आणि फॉस्फरस) यांचा वापर एड्सच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एआरटी किंवा अँटीरिट्रोव्हायरल थेरपी वा इतर प्रकारच्या उपचारांसोबत केला जाऊ शकतो.

या उपचारामुळे एड्सशी संबंधित गुंतागुंतींची काही सरसकट आढळणारी लक्षणे परिणामकारकरित्या सुसह्य होऊ शकतात. या उपचारांमुळे रुग्णाच्या एकूण रोगप्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा होत असल्याने, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने जडणाऱ्या संसर्गांशी (ऑपॉरच्युनिस्टिक इन्फेक्शन्स) लढा देणे शक्य होते.

डॉ. मुकेश बत्रा पुढे म्हणाले, “जागतिक एड्स दिन वर्षातून केवळ एक दिवस पाळला जातो, मात्र एचआयव्हीशी झुंज देणाऱ्यांना वर्षभर आधार देण्याची गरज आहे. या प्राणघातक आजाराशी लढा देण्यासाठी व आयुष्ये वाचविण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. एचआयव्ही निर्मूलनाचा एक उत्तम मार्ग म्हणजे या आजाराविषयी जागरुकता निर्माण करणे, जेणेकरून आपण आपल्या भावी पिढ्यांना एक एड्समुक्त जग देऊ शकू. तसेच अशा रुग्णांना मोठा दिलासा

पुरविण्यासाठी होमियोपॅथीचा वापर अत्यावश्यक आहे. या उपचारांमुळे आजार बरा होत नसला तरीही होमिओपॅथीमुळे एचआयव्ही रुग्णांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला प्रचंड उभारी मिळू शकते. यामुळे संसर्गाचा धोका खूप कमी होतो, रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती आणि एकूणच जीवनमानाचा दर्जा यांत सुधारणा होते. म्हणूनच एचआयव्हीच्या उपचारांमध्ये होमियोपॅथीकडून हाताळली जाणारी रोगप्रतिकारशक्तीची बाजू हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.”

होमियोपॅथीमुळे एड्स बरा होत नाही हे जरी खरे असले, तरीही पूरक वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांना कशाप्रकारे लक्षणांपासून आराम मिळू शकतो, भूक आणि स्वास्थ्यामध्ये सुधारणा होते, वजन वाढते आणि ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्सची वारंवारता कशाप्रकारे कमी होते हे अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे. होमियोपॅथीमुळे केस गळणे, स्मरणशक्ती कमी होणे या समस्यांवरही उपचार होऊ शकतो तसेच नैराश्य आणि इतर न्यूरोलॉजिकल समस्यांवरील उपचारांतही ती उपयुक्त ठरू शकते.

एचआयव्ही आणि एड्सच्या उपचारांच्या क्षेत्रात सकारात्मक विकास होण्याच्या या युगामध्ये या स्थितीच्या विविध टप्प्यांमध्ये रुग्णांना मदत करणारी उपचारपद्धती अशी होमिओपॅथीची ओळख प्रस्थापित होऊ लागली आहे व ही उपचारपद्धती या स्थितीसह जगणाऱ्या व्यक्तींना एक दीर्घ आणि निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी