हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरातील न.पा.व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक मुख्यप्रवेश रोडवर कुठे ही वाहने उभे करत असल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे आपघात होण्याची नेहमी भीती नागरिकांना राहत आहे.
येथील बस्थानक परिसरात नेहमी वाहनाची प्रवाशाची व नागरिकांची वर्दळ असते. तसेच एसबीआय शाखेची ग्रहकासाठी पार्कीग नसल्याने ते पण जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात येत असल्याने नेहमी रोडवर वाहतुकीची कोंठी होत असतांना दिसुन येत आहे. याच रोडवर रोडचे काम सुरु आहे वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनने ऐखाद्या तरी वाहतूक पोलिसची नियुक्ती करायला हवी. ती पण दिसुन येत नाही यावर पोलिसांचे नियंत्रण नसल्याने येथे कधी मोठं आपघात होण्याची शक्यता आहे.
तामसा टी पाईट ते सिनेमा टाकीज पर्यत काही व्यापा-यानी आपल्या दुकाना समोर मुरुम टाकून टेकडे तयार केले असुन, तर काही व्यापा-यानी चक्क सरकारी नालीवरच अतिक्रमण केलेले आहे. रोडचे काम अत्यंत संथ व कञाटदाराच्या मणात येईल तेव्हा करत असल्याने याचा ञास नागरिकांना वाहनधारकाना निमूटपणे सहन करावा लागत आहे.
शहरात किवा मार्केट मध्ये कुठं व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर ग्रहकांच्या पार्कीगची व्यवस्था न केल्यामुळे ग्राहक ही कुठं मुख्यरोडवर आपली वाहने उभी करत असतात. अनेक वाहने खोदुन ठेवलेल्या रोडवर उतरवितात. यामुळे पण बाबासाहेब आबेडकर चौकात नादेड तामसा रोडवर अपघाताची शक्यता नेहमी असते. या मध्येच उसाचे ट्रक ट्रक्टर उसाच्या वाहतूकीमुळे तर फार ञासदायक शहराचा मुख्यप्रवेश रोड बनला आहे. त्यातच रोडवरिल अस्तव्यस्त उभ्या वाहनाची भर यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी माञ प्रशासन तयार दिसत नाही.
जनता व प्रशासनाचे 'समन्वय नाही..
हदगाव शहरात न.पा. प्रशासन व पोलिस याचे अलिकडच्या दोनतीन वर्षात अजिबात 'समन्वय नसल्याचे दिसुन येते. परिणाम स्वरुप गुन्हायाचे प्रमाण वाढत आहे कारण हदगाव पोलिस स्टेशनला कोण नवीन पोलिस निरक्षक येईल याची शास्वती नसल्याने दोन वर्षात किमान तीन ते चार पोलिस निरक्षक बदलुन गेल्याची माहीती मिळते. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसुन येत आहे. जनता व पोलिसाचे समन्वय असणे फार महत्त्वाचे आहे अस नागरिकांत बोलल्या जात आहे.