नांदेड| नांदेड शहरात जगभरातून लाखो शिख बांधव यांनी गुरूतागद्दी त्रिशताब्दी सोहळ्यात सहभागी झाल्याने एक अभूतपूर्व क्षण अनुभवलेल्या नांदेडकरांना काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा सुरेख नियोजनचा ऐतीहासीक सोहळा अनुभवताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाची चमक पुन्हा एकदा उजळून निघाल्याची दिसून आली असून ज्या नियोजनाला त्यांच्या परिसाचा हात लागतो त्याचे सोन होते, हे निवडणुका असो की कुठल्याही इव्हेंटमधून सातत्याने सिद्ध होत आले आहे.
नांदेड जिल्ह्याचे अनभिशिक्त नेते अशोरकाव चव्हाण यांचे वर्णन अनेक विशेषणांनी करता येते. पण त्यातही मिस्टर परफेक्शनिस्ट आणि दिलदार या दोन शब्दांनी चांगल्या प्रकारे करता येते. कोणतेही काम अचूक काटेकोर आणि काल मर्यादेत करणे हे त्यांचे त्यांच्या कामाच्या नियोजनाचे ठळक वैशिष्ट्य होय. नियोजनबद्ध काम या त्यांच्या वैशिष्ट्याची छाप नांदेड जिल्ह्यातील अनेक कामांवर पडलेली आहे. नांदेड जिल्ह्यात येऊन गेलेली राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ही अशोकरावांच्या आखीव रेखीव नियोजनामुळे यशस्वी ठरली. तसेच ऐतिहासिक देखील ठरली.
अशोकराव चव्हाण यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक क्षण म्हणजे गुरूतागद्दी त्रिशताब्दी सोहळा. शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या नांदेड शहरात 1708 साली श्री गुरू गोविंदसिंघ यांनी श्री गुरू ग्रंथ साहिब या धर्मग्रंथास गुरू हा दर्जा दिला. त्या घटनेस 2008 मध्ये तीनशे वर्ष पूर्ण झाली.
या त्रिशताब्दीचा सोहळा हा निश्चितच ऐतिहासिक होता. तो सोहळा तितकाच भव्य दिव्य करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री या नात्याने अशोकरावांनी जीवापाड मेहनत घेतली. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान, युपीए चेअरमन सोनिया गांधी यांच्यासह देशातील सर्व मोठ-मोठे पदाधिकारी-नेत्यांची हजेरी त्यांच्या नेतृत्वाची ताकद होती.
महाराष्ट्रात देगलूरच्या सीमेवर भारत जोडोचे ग्रँड वेलकम. देगलूर ते अर्धापूर पर्यंत ठिकठिकाणी यात्रेचे हजारो लोकांनी केलेले स्वागत. भारत जोडोतील यात्री यांची सोय नांदेडमध्ये अती उत्तम झाल्याचे बोलल्या जात आहे. राहणे, खाणे एवढेच नव्हे तर मोबाईल चार्जींगपासून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नांदेडमध्ये झालेली लाखो लोकांची विराट सभा ही अविस्मरणीय व ऐतीहासीक ठरले असल्याचे मानले जाते. अशोकरावांची परफेक्ट टायमींग आणि सुरेख अचूक नियोजन असल्याने त्यांना मॅनेजमेंट गुरू म्हणून संबोधणे हे त्यांच्या कार्यकौशल्याचा गौरवच मानल्या जातो.