लोहा| खेडकरवाडी येथील कन्या शैलजा बाळजीराव खेडकर ही विद्यार्थिनी कंधार च्या फार्मसी कॉलेज मध्ये शिक्षण घेते तिने निपनेर (NIPER) पीजी पीएचडी या फर्मासिक्युट या परीक्षेत ती देशात सातवी आली आहे. तर जी पॅट या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविले आहे.
शैलजा ही खेडकरवाडी सारख्या लहान खेड्यात तिने प्राथमिक शिक्षण यश संपादन केले .तिचे वडील मंदिर बांधकाम करतात. अशा परिस्थितीमध्ये तिने नेत्र दीपक यश संपादन केले आहे. फार्मसी विद्या शाखेतील अंत्यत प्रतिष्ठेची समजली जाणारी निपर पीजी पीएचडी या परीक्षेत शैलजा देशात सातवी आली आहे.
GPAT परिक्षेत 1हजार 892 रँक आला आहे. निपर परिक्षाही भारतातील फार्मासुटीकल एजुकेशन रिसर्चसाठी अवघड पण महत्वाची परिक्षा मानली जाते. या यशाबद्दल स्वामी, रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू उदवराव भोसले सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक डॉ गोविंद नांदेडे कॉलेजचे सचिव डॉ सुनिल धोंडगे डॉ ज्योती सुनिल धोंडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.लोह्यातील कापड व्यापारी बालाजी नागासाकरे यांनी जाहीर सत्कार केला. उपनगराध्यक्ष, दत्ता वाले सरपंच शिवकुमार खेडकर ,माजी सरपंच वसंतराव कारेगावकर, बालाजी खेडकर,यासह अनेकांज शैलजाचे अभिनंदन केले आहे.