लोहा| महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जनतेला दिवाळीच्या सणासाठी "आनंदाचा शिधा" उपलब्ध करून देण्यात आला आहे .या योजनेचा लोहा येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार व्यंकटेश मुंडे,पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार राम बोरगावकर यांनी वेळेत नियोजन केले त्यामुळे दिवाळी पूर्वीच तालुक्यातील कोपन दुकानावर साखर -तेल दाळ रवा मिळणार आहे
लोहा तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व (APL) एपीएल योजनेतील एकूण 50 हजार 182 कार्ड धारक आहेत. आनंदाचा शिधा अंतर्गत तहसीलदार मुंडे व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिवाळीपूर्वी स्वस्त धान्य दुकानदार याना रवा, साखर, चना दाळ, पामतेल मिळावे. जेणे करून कार्ड धारकांना वेळेत वाटप होईल याची काटेकोरपणे नियोजन केले. टीम बोरगावकर तसेच पेशकार गणेश मोहिजे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे वेळेवर दुकानदारांना पुरवठा होतो आहे.
प्रतिशिधा पत्रिकेसाठी एक मिश्र, रवा, एक किग्रॅ. साखर, एक कि. ग्रॅ. चना डाळ, व एक लिटर पामतेल असा शिधाजिन्नस संच केवळ १०० रुपयामध्ये स्वत्त धान्य दुकानामधून उपलब्ध केला जात आहे. त्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ शासकीय गोदाम येथे करण्यात आला.
नायब तहसीलदार राम बोरगावकर, खविसं चे उपसभापती श्याम पाटील पवार, सुधाकर सातपुते, सिद्धू वडजे, हिलाल पाटील खांबेगावकर, विजय जोंधळे, सचिन कल्याणकर, गोदामपाल सतीश धोंडगे, यासह कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या तीन- चार दिवसात तालुक्यातील लोहा तालुक्यातील 1 हजार 166 स्वस्त खान्य दुकानामधून पात्र प्रत्येक लाभान्याला आनंदाचा शिधा - जिन्नस संच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे असे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी सांगितले.