मुख्यमंत्री साहेब ..! दिवाळी कशी साजरी करायची हो....
हदगाव,शे चांदपाशा| हदगाव तालुक्यात सतत पाऊस कोसळत आहे. शेतातील हाताला आलेलं सोयाबीन पाण्यामुळे गेलं बहुतांशी शेतक-याच्या पाणी साचलेल आहे. परिणाम सोयाबीन अतिपावसामुळे सडून गेले आहे. बाजारात भाव पडलेला आहे. प्रशासकीय यंञणा फक्त प्रशासकीय मिटींगाचे निमित्तानं काहीही ऐकण्यास तयार नाही. शासनच्या घोषणाबाजीचा ञस्त शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. परिणाम स्वरूप सर्वसामान्य शेतकरी 'आत्महत्या ' च्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे.
शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचुन काढणीला आलेलं सोयाबीन भुईसपाट तर काही ठिकाणी काढून सोयाबीन चे ढिग भूईसपाट झालेली आहे अतिवृष्टीमुळे जमीनी खंगाळून निघाल्या आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनला हमी भाव नाही. सोयाबीन भाव नसल्याने मुख्यमंत्री साहेब दिवाळी हा सण कसा साजरा करायचाहो अशी हाक शेतकरी देत आहे. परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनच प्रचंड प्रमाणात नुकसान झालं या तर अनेक शेतक-याच सोयाबीन काढणी रखडलेली आहे.
आमदार व खासदार कडुन दिलासा हवा ...!
अतिवृष्टी व कर्जबाजारीला वैताग शेतकरी नैराश्येच्या गर्तेत जात आहे. अश्या कठीण समयी तालुक्याचे विद्यमान आमदार व खासदार यांनी प्रत्यक्षात दिलासा व शासनाकडुन मदत मिळवून देवूच अश्या दिलासाची नितांत गरज आहे. तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे सर्वसामान्य शेतक-याना सबधोतित करणे फार गरजेच आहे. तालुक्यात सतत गेल्या तीन वर्षाच्या दुष्काळात कधी आतिवृष्टी तर कधी अतिवृष्टीमूळे हदगाव तालुक्यातील शेतकरी पार खचुन गेलेला आहे. अश्या वेळी आमदार व खासदाराने शासनाला मदत करण्यास भाग पाडावे. शेतक-याला नेत्याकडून सांत्वनाची नाही तर अर्थिक मदतीची अवश्यकता आहे .अशी ञस्त शेतक-याची अपेक्षा दिसुन येत आहे.