सम्राट शाळेत शिक्षकदिनी विद्यार्थीनी चालविली शाळा -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
"आम्ही चालवू आमची शाळा " या उपक्रमाअंतर्गत उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत पाच सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा  शिक्षक दिन म्हणून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचे प्रशासन चालविले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक "आम्ही चालवू आमची शाळा " या उपक्रमांतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींनी एक दिवस शाळा चालवावी असे निर्देश दिले. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर तसेच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, तुमचं नाव काय यांच्या सूचनेनुसार कंधार तालुक्यात बीईओ  संजय येरमे , शिक्षणविस्तार अधिकारी वसंत मेटकर ,केद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी सर्व शाळेत स्वयंशासन दिन घेण्याचे आव्हान केले.


सम्राट अशोक  प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  राहुल सोनसळे यांनी 'आम्ही चालवू आमची शाळा  , अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना एकदिवसीय शाळा प्रशासन चालवण्याची जबाबदारी दिली. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून प्रतिक्षिल अंगुलीकुमार सोनसळे या विद्यार्थ्यांनी काम पाहिले ,. तर  मुस्कान शेख , हर्षदा कांबळे , गौरी वारकड ,नमीरा पठाण ,तेहसीम शेख  ,   सोहम सोनटक्के , बरीरा पठाण , तबसुम शेख , सिफा शेख ,उषख  कुरुड  ,राहत पिंजारी ,सुमेरा शेख , यांनी  शिक्षकाची भूमिका निभावली आणि सेवक म्हणून ओंमकार डांगे ,जाधव आजय, यासीन शेख ,पठाण यानी आचारी म्हणून काम केले.

उत्कृष्ट प्रशासनाचे काम पाहिले ,व अनुभव घेतले.सकाळी शाळेत शिक्षक दिनी  मा.राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.यावेळी मु.अ.राहुल सोनसळे  यांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन व लेखनी पेन देऊन  , आदरपूर्वक सत्कार केला. यावेळी शाळेतील सहशिक्षिक भगवान राक्षसमारे, देविदास डांगे,मन्मथ केसे, नितिन लाटकर,शेख , सोनसळे मॅडम , यांची उपस्थिती होती.शाळेत आम्ही चालवू आमची शाळा हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी