नांदेड| आज दि. १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त नांदेड दौर्यावर आले असता राज्य गुणवंत कामगार असोसिएशन नांदेड जिल्ह्याच्यावतीने त्यांना आपल्या गुणवंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन माता गुजरीजी विसावा उद्यान स्टेडियमजवळ हुतात्मा स्मारक येथे देण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे नांदेड महानगर अध्यक्ष मा.श्री. प्रविणभाऊ साले यांनी निवेदन स्वीकारले. यामध्ये राज्यातील सर्व गुणवंतांच्या मुख्य मागण्या म्हणजे गुणवंत कामगारांना एसटी महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास देण्यात यावा, गुणवंत कामगारांना इंक्रीमेंट व प्रमोशन देण्यात यावे व शासनाच्या विविध कमिट्यांवर गुणवंतांची निवड करण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी भाजपा महानगराध्यक्ष मा. प्रविणभाऊ साले यांनी मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पोहोचविण्याचे आश्वासन देऊन निवेदन स्विकारले. या शिष्टमंडळात विभागीय कार्यकारीणी संचालक तथा एसटी मेकॅनिक सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड, जिल्हाध्यक्ष मा.श्री. रत्नाकर शिंदे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री. पंडीत तेलंग, जिल्हा सचिव मा.श्री. विजय रणखांब, उपाध्यक्ष मा.श्री. रामदास पेंडकर, संघटक मा.श्री. राम ठाकूर, जेष्ठ मार्गदर्शक तथा सल्लागार आनंद गंगातीर यांची प्रमुख उपस्थिती होती.