नांदेड| एमजीएम महाविद्यालयाच्या संचालिका तथा प्राचार्या डॉ. गीता लाठकर यांचे पती डॉ. श्रीकांत पद्माकर लाठकर (67) यांचे आजाराने दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजता मुंबई येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
नांदेड शहरातील चिखलवाडी कॉर्नर येथील डॉ. श्रीकांत लाठकर यांनी आयटीआय येथे प्राचार्य म्हणून 15 वर्षांहून अधिक काम पाहिले. बी.ई. मेकॅनिकल व त्यानंतर डॉक्टरेट ते झाले होते. त्यांनी विविध ठिकाणी काम पाहिले. एमजीएमच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांचे ते पती होते. डॉ. श्रीकांत लाठकर यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 30 ऑगस्ट रोजी शांतीधाम गोवर्धन घाट स्मशानभुमी नांदेड येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
