निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकीगसाठी शिबिराचे आयोजन -NNL

11 सप्टेंबर रोजी मासिक विशेष शिबिराचे आयोजन


नांदेड, अनिल मादसवार|
मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी, मतदारांचे निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकींग करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मतदारांकडून आधार तपशिल गोळा करण्याबाबतच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. जास्तीत जास्त लोकसहभाग व मतदारांचे निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकीग करण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील 344 तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील एकुण 308 मतदान केंद्रावर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार तथा सहा. मतदान नोंदणी अधिकारी यांनी केले आहे. 

मतदारांनी पुढीलप्रमाणे मतदार ओळखपत्रास आधार लिंकीग करुन घ्यावे. मतदाराना व्होटर हेल्प लाईन ॲपद्वारे आधार लिंकीग करण्यासाठी निर्देशित करावे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक चालक यांच्याद्वारे मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. तसेच दंवडीद्वारे याबाबत प्रचार व प्रसार करण्यात यावा. संबंधित बीएलओशी संपर्क करुन मतदान केंद्रावर जावून मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. तहसिल कार्यालय नांदेड येथील बीएलओ कक्ष (निवडणूक विभाग) येथून मतदार ओळखत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. नांदेड तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रावर विनामुल्य देखील 100 टक्के मतदार ओळखपत्राशी आधार लिंकीगचे काम पूर्ण करुन घ्यावे. 

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 11 सप्टेंबर 2022 रोजी मासिक शिबिराचे आयोजन मतदार केंद्रावर करण्यात येणार आहे. या शिबिरात उर्वरित असलेले मतदार ओळखपत्राशी आधार लिंकीगचे काम 100 टक्के पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत. याबाबत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे संबंधित वसुली अधिकारी, सुपरवायझर यांना आदेशित केले आहे, असे तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी