नांदेड| दिनांक 30 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेडच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भोगळ्या कारभारा विरोधात परीक्षा नियंत्रकाच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वारंवार निवेदने देऊन सुध्दा विद्यापीठ प्रशासन मागण्या पूर्ण करत नव्हते. यावेळी BSC च्या विद्यार्थ्यांच्या निकलामध्ये झालेल्या त्रुटी दुरुस्त कराव्यात ,MSW च्या विध्यार्यांची प्रवेश रजिस्ट्रेशन तारीख वाढवून द्यावी व ती प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने करावी.या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी नांदेड महानगरमंत्री गणेश हत्ते,जिल्हा संयोजक सतीश भोळे,जिल्हा सहसंयोजक अजिंक्य लाटकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.