उस्माननगर, माणिक भिसे| लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेले समानतेचे विचार प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणणे ही काळाची गरज बनली आहे असे स्पष्ट प्रतिपादन कंधार लोहा तालुक्यातील लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे कलंबर ( बु) येथे बोलताना प्रतिपादन केले.
कलंबर ( बु) ता.लोहा येथे नवयुवक अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते क्रांती ध्वजारोहण करण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य बालाजीराव परदेशी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव कोंडालवाडे ,माजी सरपंच रावसाहेब भोपाळे , दिलीप कांबळे, पोलिस पाटील विश्वनाथ पा.भोकरे ,माधव घोरबांड ( संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष) मनोहर करडे, बाबू अण्णा गोरे,अनिल सोरगे, बाबूभाई सय्यद, बालाजीसिह चंद्रकांत सिंह परदेशी ( मा.जि.प.सदस्य नांदेड ) परशुराम वडजे ( मा.प.स.सदस्य )
सौ. विमलबाई मन्नुसिंह ठाकुर ( सरपंच कलंबर बु) माधव मोकले (उपसरपंच) वा.ना.लोंढे , सहशिक्षक , विश्वनाथ काशीराम पाटील भोकरे पोलीस पाटील कलंबर बुद्रुक, बाबुराव उमाजी गोरे माजी तंटामुक्त अध्यक्ष कलंबर बुद्रुक बळीराम केरबा पाटील भोकरे (तंटामुक्ती अध्यक्ष कलंबर बुद्रुक) उत्तम कामाजी कुंडलवाडे( माजी पंचायत समिती सदस्य लोहा), मनोजसिंह सदरासिंह ठाकुर, धनंजय रौत्रे ( ग्रा.प. सदस्य) मारोती करंडे ,भैयालाल मंडले ,रमेशसिंह चौव्हाण ,राणाप्रताप चंदेल , कैलास मेहर,पिंठू मरमठ , नामदेव तारू , बाबूलाल मंडले,चरणसिह मेहर , यांच्या सह पत्रकार मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे जयंती मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.नवयुवक अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ यांच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावी परीक्षेत प्रथम व द्वितीय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य बक्षीसरूपी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की ,अण्णाभाऊंनी जे जीवन जगले ते त्यांनी आपल्या साहित्यात मांडले त्यांच्या कथा कादंबरी मधला नायक अन्यायाच्या विरोधात बंड करून उठतो गुलामीच्या विरोधात लढा देतो .हजारो वर्षाचे जुने विचार फेकून देऊन स्वाभिमानाचे नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊंनी मांडलेला समतेचा विचार हा मानव मुक्तीचा विचार आहे. त्याने सांगितलेल्या विचारांची समाजाला अत्यंत गरज आहे .त्यांचे विचार आचरणात आणून त्यांना अभिप्रेत असलेला शिक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सुशिक्षित झालं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आता तरुणापाय नाही असे शेवटी ते म्हणाले.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक तेलंग यांनी केले .दुपारी गावातील प्रमुख रस्त्याने आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तरुणांनी डिजेवर बेधूद थिरकली. शिवशंकर निळकंठे ,नितेश निळकंठे, ओमप्प्रसाद निळकंठे ,संदीप निळकंठे ,विष्णू निळकंठे ,राजू वाघमारे ,माधव गोमस्कर, विश्वनाथ निळकंठे ,नागेश निळकंठे, तुकाराम कंधारे ,विष्णू वाघमारे, राहुल वाघमारे ,तुकाराम आगलावे, नारायण कंधारे ,शिवाजी निळकंठे, गणेश निळकंठे ,दयानंद वाघमारे, अनिल वाघमारे ,तुकाराम कंधारे, माधव वाघमारे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.