हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित क्लिन इंडिया अंतर्गत महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पहिल्या सत्रात सकाळी ठीक दहा वाजता बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा शेषराव माने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम या लाभल्या होत्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा शेषराव माने हे उपस्थित होते. तसेच मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून स्टाॅफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, नॅक समन्वय डॉ. गजानन दगडे, प्रा महेश वाखरडकर लागले होते. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ शिवाजी भदरगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
सदरील स्वच्छ अभियानाच्या दूसर्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालया अंतर्गत व महाविद्यालयाचा परिसरातील जवळपास 26 किलो प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर प्लास्टिक कचरा मुक्त करुन स्वच्छ करण्यात आला.