आषाढी एकादशी यात्रे निमित्त जालना, औरंगाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता विशेष गाड्या धावणार -NNL

रेक स्वनरचनेत बदल, डब्यांची संख्या वाढवली


नांदेड, अनिल मादसवार|
आषाढी एकादशी यात्रे च्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.  या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात.  त्यांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे   या विशेष रेल्वे सेवा उद्या दिनांक 9 जुलै, 2022 ला धावणार आहेत. प्रवाश्यांच्या गरजा लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने या तिन्ही गाड्यांच्या रेक स्वनरचनेत बदल करून डब्यांची संख्या वाढवली आहे. 

तो पुढील प्रमाणे -    1.    जालना – पंढरपूर – जालना विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07468 पूर्वी 13 डब्यांची धावणार होती आता यात 5 डब्बे वाढविण्यात आले असून उद्या ही गाडी 18 डब्बे घेवून घावणार आहे, ज्या मध्ये 5 स्लीपर क्लास, 11 जनरल आणि 2 एस.एल.आर असे 18 डब्बे असतील.

2.    औरंगाबाद - पंढरपूर - औरंगाबाद विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07515 पूर्वी 13 जनरल, 2 स्लीपर क्लास आणि आणि 2 एस.एल.आर चे डब्बे घेवून धावणार होती आता यात बादल करून या गाडी मध्ये 8 जनरल आणि 7 स्लीपर क्लास आणि 2 एस.एल.आर चे डब्बे घेवून धावणार आहे.

3.    नांदेड – पंढरपूर – नांदेड विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी पूर्वी 4 स्लीपर क्लास ,   3 जनरल, 6 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 02 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत,  01 प्रथम श्रेणी वातानुकूलित आणि  2 एस.एल.आर  असे 18 डब्बे घेवून धावणार होती त्यात आता बादल करण्यात आला असून उद्या 7 स्लीपर क्लास , 2 जनरल, 5 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 02 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि  2 एस.एल.आर  असे 18 डब्बे घेवून धावणार आहे.   4.    या तिन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात कुठलाही बदल केला गेला आहे. या गाड्या या कार्यालयाने पूर्वी घोषित केलेल्या वेळापत्रका नुसारच धावतील.  या तिन्ही गाड्या पुढील वेळापत्रका प्रमाणे धावतील --

जालना – पंढरपूर – जालना विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07468 आषाएकाशी विशेष जालना स्थानकावरून 9 जुलै 2022 रोजी सायंकाळी 19.20 वाजता निघेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 07469 विशेष गाडी 10 जुलै, 2022 रोजी रात्री 20.30 वाजता पंढरपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता जालन्याला पोहोचेल.

औरंगाबाद - पंढरपूर - औरंगाबाद विशेष ट्रेन सेवा: गाडी क्रमांक 07515 विशेष ट्रेन 9 जुलै  2022 रोजी औरंगाबाद स्टेशनवरून रात्री 21.40 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.  परतीच्या दिशेने गाडी क्र. 07516 स्पेशल पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै 2022 रोजी रात्री 23.00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता औरंगाबादला पोहोचेल.

नांदेड – पंढरपूर – नांदेड विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड स्थानकावरून 9 जुलै 2022 रोजी दुपारी 15.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 07499 स्पेशल पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै 2022 रोजी रात्री 21.30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 18.50 वाजता नांदेडला पोहोचेल. 

पंढरपूर मंदिरात आषाढी एकादशी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी विशेष रेल्वे गाडी रात्रीचा प्रवास सोयीस्कर करेल. या विशेष गाड्यांना विभागातील सर्व वारकऱ्यांच्या / भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिन्ही ठिकाणांहून वेगवेगळ्या रेल्वे सेवा देण्यात आल्या आहेत.  पंढरपूर येथे दिवसा उत्सवाला हजेरी लावण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी परतीच्या दिशेने परत येण्यासाठी या रेल्वे गाड्या वारकऱ्यांच्या / भक्तांच्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करतील असे श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी कळवले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी