हिमायतनगर। कारला येथील शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड हे आपल्या शेतीकडे जात असताना मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यात वृध्द शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
कारला गावालगत नव्याने पुल बांधकाम झाले असून, त्यामुळे शेतीच्या कडेने नाल्या देखील काढल्या गेला आहेत. शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते. परंतु ते दुपार पर्यंत घरी परतले नसल्यामुळे घरच्या मुलांनी शेताकडे जाऊन शोधाशोध केला.
परंतु वडील दिसत नसल्यामुळे रानोमाळ फिरुन कुठेही दिसून आले नाही यातच गावालगत असलेल्या रस्त्यावरील नाल्यात हातातील काठी आढळून आली. यावरून शोध घेतला असता त्याच नाल्यात मृतदेह आढळून आला आहे. शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,नातु असा परिवार आहे.घटनेची माहिती बोरगडी सज्जाचे तलाठी आमनवाड यांना दिली महसूल प्रशासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे तलाठी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक भुसनुर यांनी देखील भेट देऊन कुटुंबियाचे सांत्वन केले. कारला येथील वृध्द शेतकऱ्याचा पहिल्याच मुसळधार पावसामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता सदरील शेतकऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत .