भोकर ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन साजरा -NNL


भोकर।
आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस दि.१२ मे हा दिवस  " जागतिक परिचारिका दिन " म्हणून साजरा केला जातो. जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) साजरा केला जातो. फ्लोरोन्स नाइटिंगेल त्यांच्याच स्मरणार्थ जागतिक परिचारिका हा दिन साजरा केला जातो. या दिनाचं वैशिष्ट्य नेमकं काय?

परिचारिका दिनाचा इतिहास :- दि. १२ मे १८२० रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या १६ वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. परंतु वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते. कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि १८५१ मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. 


१८५३ मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं.१८५४ मध्ये क्रीमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवल होत. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि प्रादुर्भावामुळे सैनिकांचा मृत्यू झाला. फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं. यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली.

युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. १८५६ मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.

१३ ऑगस्ट १९१९ रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचं निधन झालं. फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं.आणि म्हणूनच मागील दोन वर्षाच्या कोरोना महामारीत कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी पार पाडून जनसेवा केलेल्या प्रत्येक परिचारिका भगिणीस नतमस्तक मानाचा मुजरा.

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे " जागतिक परिचारिका दिन "गुरुवार , दि. १२ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. फ्लोरोन्स नाइटिंगेल परिचारिका यांच्या प्रतिमेस ग्रामीण रुग्णालय भोकर येथील परिसेविका सुचिता नवघडे, राजश्री ब्राम्हणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्रीमती मुक्ता गुट्टे आरोग्य सेविका यांनी प्रतिज्ञा वाचन केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

यावेळी डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ राजाराम कोळेकर दंत चिकित्सक, डॉ सारीका जेवळीकर,डॉ सागर रेड्डी  बालरोग तज्ञ, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती यन्नावार, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, बालाजी चांडोळकर, अत्रीनंदन पांचाळ,मनोज पांचाळ  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती ज्योती शेंडगे, संगीता तोटेवाड, निलोफर पठाण, संगिता महादळे, दिपके, छाया बोड्डेवाड, माटोरे,  अधिपरिचारिका, संगिता पंदिलवाड, सरस्वती दिवटे, धुमाळे, सुवर्णकार, भालेराव आरोग्य सेविका, गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे, संदीप ठाकूर, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी, माया आडे डाटा ऑपरेटर, सुधाकर गंगातीर आरोग्य मित्र, बडेलू, महादळे, शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी