किनवट। शहरातील बालाजी मंदिरात भगवान परशुराम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बहुसंख्येने बृम्हवृंदानी सहभाग नोंदवला होता, आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी भुषवले तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, अभय महाजन, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, रामराव पत्की, दा. सु. वैद्य गुरुजी, गजानन लाठकर गुरुजी यांची होती.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलतांना नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी सांगितले कि ब्राम्हण समाजाचे प्रश्न असो व विविध मागण्या असो त्या सोडवण्याकरिता आम्ही सदैव सक्रीय आहोत तर ब्राम्हण समाजाने इतर समाजाच्या कल्याणाकरिताच सदैव प्रयत्न केले आहे तर ब्राम्हणाच्या कोणत्याही कार्यामध्ये सदैव लोककल्याण हेच धेय्य असते. तर श्रीनिवास नेम्मानिवार यांनी आपल्या संबोधनात बोलतांना सांगितले कि ब्राम्हणांच्या सक्रीय सहभागा शिवाय कोणते हि राजकारण पुर्ण होत नाही. परंतु राजकिय लाभाकरिता विविध राजकिय पक्ष हे ब्राम्हणांचा गैरवापर करतात. हे दुर्दैवी असुन कोणत्याही समाजाच्या व्देषाशिवाय राजकारण केलेले हे समाजा करिता आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी भगवान परशुराम, संत साहित्य, समाजातील आजची ब्राम्हणांची स्थिती, संस्काराची समाजाकरिता गरज इ. बाबीवर विस्तृत भाष्य केले व आपले परखड मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. निलेश भिलवडीकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ शिरिष पत्की यांनी मानले.
आयोजित कार्यक्रामात ब्राम्हण महासंघाची नविन कार्यकारणी एकमताने घोषित करण्यात आली ज्यामध्ये पत्रकार आशिष देशपांडे यांची किनवट तालुका ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते कचरु जोशी यांची ता. सचिव पदी निवड घोषित करण्यात आली तर आगामी काळात विस्तृत कार्यकारणी घोषित करण्यात येईल असे हि नवविनियुक्त अध्यक्ष आशिष देशपांडे यांनी यावेळी बोलतांना सांगितले तर उपस्थित ज्येष्ठ ब्रम्हवृंदानी नवनियुक्त कार्यकारणीचा सत्कार केला तर मावळते अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांनी अध्यक्षित पदभार नवनियुक्त अध्यक्ष आशिष देशपांडे यांच्याकडे सोपवला.
आयोजित कार्यक्रमात ब्राम्हण समाजातील प्रतिभावंताचा सत्कार करण्यात आला यामध्ये अल्पावधीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उस्तुंग भरारी घेतलेले सारंग वाकोडीकर, शिक्षण क्षेत्रातील प्रा. सदाशिव जोशी, पत्रकार क्षेत्रातील पुरस्काराबद्दल आशिष देशपांडे यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर यावेळी रेणुकादास पांडे, नारायण चणमनवार, प्रा. राजु जोशी, प्रा. सुहास कुलकर्णी, प्रा. रेणुकादास पोहरकर, प्रा. नागेश वैदय, प्रा. योगेश वैद्य, विनोद पाटील, प्रा. परशुराम जोशी, सचिन कद्रे, गणेश शर्मा, राहुल नेरलकर, सुनिल चांदुरकर, गजानन कोत्तावार, बंडु पांडे, अभय चौधरी, पवन गुरु, विमर्श पाटील, श्रीमती पोहरकर, सौ. लाढकर, सौ जया कोट्टावार, श्रेयस माडपेल्लीवार, मयुरेश , रविंद्र चौधरी, कृष्णा देशपांडे, प्रद्युम्न जोशी यांची उपस्थिती होती.