उस्माननगर येथे कडक उन्हात रक्तदान करून महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
बाराव्या शतकातील थोर युगपुरुष, वीरशैव लिंगायत धर्म प्रसारक व प्रचारक क्रांतीवीर , क्रांतीसुर्य, सामाजिक क्रांतीचे जनक जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव यांच्या वतीने कडक उन्हाची परवा न करता तरूणांनी भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यास उस्माननगर येथे उत्साहात प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळी बसस्थानक परिसरातील नियोजित जागा परीसरात जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या फलकांच्या (पुतळा)नियोजित जागा येथील प्रतिमेचे पूजन करुन रक्तदान शिबीराचे उद्घाटन धर्मगुरू वैजनाथ स्वामी महाराज व शिवहार स्वामी महाराज यांच्या हास्ते करण्यात आले.हुजूरसाब रक्तपेढी नांदेड व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात उस्माननगर येथे ( ५० ) तरुणांनी रक्तदान करून उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

मागील आठवड्यापासून उष्णतेचे प्रमाण अधिक झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.गतवर्षी कोरोनामुळे भयभीत झाले नव्हते,पण यावर्षाच्या उष्णतेने परेशान झाले आहेत.गावातील बसव अनुयायी यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यास तरूणांनी प्रतिसाद दिला आहे.

रक्तसंकलनासाठी श्री. हजूर साहेब रक्तकेंद्र नांदेड येथील प्रवीण चव्हाण  ( टेक्निकल सुपरवायझर) बळीराम  आनंदा ढेपाळे ( जनसंपर्क  अधिकारी  ) शिवराज  तोषटवाड  तंत्रज्ञान,कु. पल्लवी सरोदे ,विशाल घोडगे  ,यांनी रक्तदात्याना मार्गदर्शन केले.साखरे. यावेळेस बाळू डांगे, गोविंद पोटजळे (ग्रा प.सदस्य) शामुकांत शेकापूरे , शिवप्रसाद साखरे , बसवेश्वर पिडगे, वैजनाथ डांगे,प्रकाश पोटजळे,बालाप्रसाद होळगे,परमेश्वर पोटजळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

उस्माननगर वीभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी विठ्ठल ताटे पाटील,प्रदीप देशमुख, माणिक भिसे, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे,ईजनि.प्रतिक देशमुख यांच्या हस्ते पुजा करुन जयंती साजरी करण्यात आली. 

ग्रापपंचायत कार्यालय येथे सुध्दा महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच जवाहरलाल नेहरू वि.वसतिगृहात महात्मा बसवेश्वर याच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळेस  वसतिगृहाचे करमचारी लक्ष्मण कांबळे, शिवा ईसादकर, ज्ञानेश्वर पोटजळे, राजेश पोटजळे, गणेश ईसादकर, सम्यक कांबळे  विष्णू पोटजळे यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.गावातील विविध ठिक ठिकाणी महात्मा बसवेश्वर व परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी