मनसेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद -NNL


नांदेड|
जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरपासून जवळच असलेल्या वाडी (बु.)  येथील वलिंग्टन विद्यालयात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले  या शिबिरास उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबीराचे उदघाटन लिंबगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागिरदार, पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उषाताई नरवाडे, दिपक स्वामी, शक्ती परमार, अजय ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरात 107 बॉटल रक्तसंकलीत करण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य श्री हजुर साहेब रक्तपेढीने केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी वेलिंग्टन विद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी