इमारत बांधकामासाठी 220 लक्ष तर रस्त्यासाठी 30 लक्ष रुपयांचा निधी
नांदेड, आनंदा बोकारे। उत्तर मतदार संघातील रहाटी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचे तसेच रस्त्याचे भूमिपूजन नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत शिवालय प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, साहेबराव धनगे, जयवंत कदम, बाबुराव वाघ, अशोक उमरेकर, सचिन किसवे, नारायण कदम, गजानन कदम, बाळासाहेब देशमुख, बळवंत तेलंग, नरहरी वाघ, माधव महाराज, संतोष भारसावडे, गणेश बोकारे, नवनाथ काकडे, धनजंय पावडे, दिपक भोसले, सरपंच सिद्धार्थ लांडगे, केशवराव बोकारे, पंढरीनाथ बोकारे, शंकरराव बोकारे, काशिनाथ बोकारे, पुंडलिकराव बोकारे, राजाराम खरबे, जगन्नाथ बोकारे, बापूराव खरबे, हरिभाऊ बोकारे, गजानन बोकारे, रुपेश वाघ, गजानन वाघ, राहुल वाघ, हरिभाऊ भोसले, बळीराम सरोदे, गणपत गोबाडे, सुभाष पवार, ओंकार सूर्यवंशी, बालाजी बोकारे, नागसेन लांडगे, व्यं,कटी बोकारे, गोरखनाथ खराबे, रंगनाथ वाघ, पंडितराव शिंदे, गंगाधर पिसाळ, गुणाजी नवरे, वसंत डुकरे, मधुकर पाटील, लक्ष्मण भोसले, तानाजी फुलारी, संतोष लोखंडे, अनिल शिंदे, रामेश्वर शिंदे, अमृत भारसावडे, सटवाजी वाघमारे, जि.प.चे घोडके, मुंढे, महावितरणचे चव्हाण यांच्यासह रहाटी परिसरातील विविध गावचे सरपंच, मा. सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आ.बालाजी कल्याणकर यांनी माझे आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच मी आपल्या परिसरात उपजिल्हा रुग्णालय देखील मंजूर करून घेतले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 65 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून घेतला आहे. याचे देखील लवकरात लवकर भूमिपूजन करणार आहे.
रहाटी येथील आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली होती. मी मागील वर्षी पावसाळ्यात पाहिले असता, ती रुग्णांसाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे मी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. याबरोबरच मी रहाटी गावाच्या विकासासाठी कटीबंध्द असून आगामी काळात खंडोबा मंदिराच्या सभामंडपा साठी पंधरा लक्ष तर इतर रस्त्यांच्या कामासाठी पंधरा लक्ष असा एकूण 30 लक्ष रुपयांचा निधी टाकणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केली आहे.
या वेळी इतरही मान्यवरांचे भाषणे झाली. त्यांनी देखील आ. बालाजी कल्याणकर यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. आ. कल्याणकार हे जनसामान्यांचे आमदार असून प्रत्येकाच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत असतात. त्याबरोबर त्यांनी कोणत्याही कामाचा शब्द दिला तर ते काम पूर्णत्वास नेतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पोपळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश बोकारे, गब्बु बोकारे यांच्यासह आदीजणांनी परिश्रम घेतले.