सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नविन घर नंबर देणे यातुन मार्च अखेरपर्यंत २ कोटी ३५ लक्ष वसुली-NNL


नविन नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा  सिडको क्षेत्रीय कार्यालय सहा अंतर्गत नवीन घर नंबर देणे यातुन  मार्च २२अखेर २ कोटी ३५ लाख ३१ हजार ४३३ नगदी  वसुली झाली आहे.
   
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने  मार्च २२ अखेर  सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत  नविन घर नंबर देणे यातुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला २ कोटी ३५ लक्ष रुपये नगदी मिळाले आहेत,  सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक सुधीर बैस,दिपक पाटील लिपीक ,संदीप धोंडगे, मारोती सांरग,मालु एनफळे, राहुल सोनसळे, रविंद्र पवळे, राजपाल सिंह जक्रीवाले, संतोष भदरगे, सुखदेव जोंधळे, यांनी संबंधितांनी संचिका दखल केल्या नंतर कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्या अहवाला नंतर ही रक्कम संबंधितांनी रक्कम नगदी भरणा केली आहे.
     
या वर्षी मालमत्ता कर मध्ये ही गतवर्षीपेक्षा या वर्षी दोन कोटी ६१  लक्ष रुपयांचा कर वसूल केला आहे. विविध करापोटी या झोन ने वसुली मध्ये वाढ केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी