नांदेड| कंधार तालुक्यातील गऊळ येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक रामा माणिका देवकांबळे (वय-७५ वर्षे) यांचे १० एप्रिल रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर ११ एप्रिल रोजी सायंकाळी गऊळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, चार मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सेवानिवृत्त सहाय्यक पोउपनि. डी. एन. मोरे खैरकेकर व पो. हे.कॉ. हनुमंतराव वाघमारे यांचे 'ते' काका होत.