नांदेड तालुक्यातील भायेगाव येथे तूप्पा आरोग्य केंद्र अंतर्गत एक कोटी रुपयांच्या ऊप आरोग्य केंद्र व २५ लक्ष रुपयांचा सिमेंट काक्रेट रस्त्याचा भुमिपूजन सोहळा १३ मार्च रोजी प नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे ,शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख आंनदराव पाटील बोढारकर, माजी जिल्हा प्रमुख भुंजग पाटील, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, पंचायत समिती सदस्य गंगाधर नरवाडे,यांच्या सह जिल्हा परिषद चे अंभियता घोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार , प्रशासकिय अधिकारी डॉ रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंढे, संरपच देशमुख.
संरपच प्रतिनिधी यन्नावार,बबन कदम, बाळु पाटील, ग्रामसेवक वाकोरे,गणपत खोसडे, गोपीनाथ पाटील कोल्हे, गणपती पाटील कोल्हे, अशोक पाटील कोचार, दतराम खोसरे, गोविंद पाटील कोल्हे, शिवानंद खोसडे गोविंद पाटील कोल्हे, विश्वनाथ पाटील कोल्हे, गंगाधर खोसडे,रामराव पाटील कोल्हे, चिमणाजी पुयड,रेशमाजी कोल्हे, रमेश कोल्हे, गिरी महाराज,यांच्या सह ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक ऊपसिथीत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठलराव पाटील खोसडे तर ऊपसिथीत मान्यवरांचे स्वागत संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, ऊपसंरपच बालाजी पाटील कोल्हे, शिवाजी खोसडे,शंकर खोसडे,गौतम भालेराव, बालाजी पाटील कोल्हे, यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने ऊपसिथीत मान्यवरांच्या डॉ.शिवशकती पवार, डॉ.बालाजी राठोड यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी आ. हंबर्डे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकासात्मक योजने अंतर्गत दोन कोटी पाच लक्ष रुपयांचा निधी म्हणून उपकेंद्र, सिमेंट काक्रेट, पेव्हर ब्लॉक, नाल्या बांधकाम केल्याचे सांगितले तर वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी राठोड यांनी हे उपकेंद्र भायेगाव,राहेगाव,किक्की या तिनं गावातील जवळपास ४२०० लोकसंख्या साठी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव पाटील कोल्हे,तर आभार बालाजी पाटील कोल्हे यांनी मानले.