नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू रामदास नाहीत हे तज्ञ इतिहासकार व कोर्टाने सिद्ध करून देखील "रामदास नही रहते तो शिवाजी को कोन पुछता था"असे चुकीचे व एकेरी भाषेत बोलणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व त्यांचे समर्थन करुन पुनश्च आगीत तेल टाकणार्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक फोटोवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवार दि ४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर थुंको आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू त्यांच्या आई राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व जग्दगुरू तुकाराम महाराज हेच होते हे अनेक तज्ञ इतिहासकार तसेच योग्य पुराव्यानिशी कोर्टाने देखील रामदासांचा आणि शिवरायांचा कोणताच स़बंध नाही ते गुरू नाहीत हे सिद्ध झाले असतांनाही मुद्दामहुन छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचा गुरू शिष्याचा स़बंध लावुन वाद पेटवुन आता राज्यपालही मागे राहिले नाहीत.राज्यपालांनी इतिहास समजुन घेऊन बोलायला पाहिजे होते. असे मत यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी व्यक्त केले.
थुंको आंदोलन हे प्राथमिक स्वरूप आहे अशाच पद्धतीने वेळोवेळी चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करसाल तर गाठ संभाजी ब्रिगेडशी असेल असे मत यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी व्यक्त केले त्यानंतर छत्रपती शिवराय गुरू - शिष्य संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी व त्यांची पाठराखण करणाऱ्या बेअक्कल व बिनबुडाचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या फोटोवर थुंको आंदोलन करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, प्रदीप गुबरे, परमेश्वर आलेगावकर, कमलेश कदम, सतीश धुमाळ,आंकुश कोल्हे, अशोक कदम, संतोष असर्जनकर,राहुल झडते,सारंग मिराशे आदिसह इतर उपस्थित होते.