नांदेड| शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई हे शिवसंपर्क अभियानांतर्गत नांदेडला आले असता त्यांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी मारवार कुतुम्बियांनी देसाई यांचा स्वागत सत्कार केला.
शिवसंपर्क अभियानाचा झंजावता गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चालू झाला. पहिल्या दिवशी नांदेड दक्षिण, उत्तर, लोहा, कंधार, नायगाव, देगलूर, मुखेड मतदार संघातील शिवसैनिकांचा मेळावा व कार्य अहवाल. दुसऱ्या दिवशी किनवट, हदगाव, भोकर मतदार संघातील विविध विषयावर सखोल मार्गदर्शन व कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. मारावार कुटूंबियांनी खासदार अनिल देसाई साहेबांचे भव्य स्वागत करुन आशीर्वाद घेतले. या वेळी प्रकाश मारावार, त्याच्या पत्नी सौ.वंदना मारावार, डॉ.सोमेश मारावार यांना खासदार अनिल देसाई यांनी आशीर्वाद दिले.
यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंढे, तालुका प्रमुख जयवंत कदम, उपजिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे, बबन बारसे, आकाश रेडी, युवा सेनेचे सहसचिव माधव पावडे, भारत सरोदे, शहर प्रमुख सचिन किसवे, डॉ.शेलचे, डॉ.नामदेव मादास, उपशहर प्रमुख अर्जुन ठाकुर, अंड.प्रदिप चव्हाण, कामगार सेनेचे शहर प्रमुख नितिन सरोदे, मुंबईचे निरीक्षक दिनेश बोभाटे, पद्मशाली समाजाचे धनंजय गुमलवार, उमेश कोकुलवार, पोलीस पाटील शिवशंकर शिरमेवार, एस.टी. कामगार सेनेचे सुधिन पटवारी, सी.पी. कदम, रवि जाधव, विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नन्नवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनलदास तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.