आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन -NNL


मुखेड|
गुरूपीठाचे पिठाधिश परम पूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 28 मार्च रोजी पापमोचनी एकादशी या शुभ मुहुर्त निमित्ताने  रविवार दि. 27 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित सेवा केंद्र मुखेड येथे सकाळी साडे दहाच्या आरतीनंतर लगेच संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तालुका व नियोजित गाव व नगरातील प्रत्येक स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्काराच्या पायावरती,जीवन मंदिरे उभे राहती...या उक्ती प्रमाणे बालवयापासूनच संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल व धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल असे परम पूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात. दिंडोरीप्रणित सेवामार्ग हा विविध 18 विभागातून 20% अध्यात्म व 80% सामाजिक कार्य शहर गाव खेड्यातून सेवेकरी प्रतिनिधीं परम पूज्य श्री गुरूमाऊलींच्या आशिर्वाद व मार्गदर्शनाने सेवाकार्य करीत असतात. 

आदरणीय गुरूपुत्र नितीनभाऊ मोरे बालसंस्कार व युवाप्रबोधन विभाग प्रमुख गुरूपीठ ञ्यंबकेश्वर यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून गर्भसंस्कार शिशूसंस्कार बालसंस्कार पालकत्व युवाप्रबोधन विभागात वर्षभरात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम देश विदेशातून राबविले जातात. त्यांच्याच संकल्पनेतून उद्याचा शैक्षणिक स्पर्धा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र आयोजन केले आहे. या विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये ईयता 1ली ते 4 थी साठी मुक्त चित्र कला स्पर्धा,इयत्ता 5 वी ते 7 वी लहान गटासाठी व इयत्ता 8 वी ते 12 वी व त्याहूनही उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी निबंध स्पर्धा व सामान्य स्पर्धा असे नियोजन नांदेड जिल्हा बालसंस्कार व युवाप्रबोधन विभाग दिंडोरीप्रणित सेवा मार्गाच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

तरी सर्व बालसंस्कार वर्ग तसेच परीसरातील शालेय विद्यार्थी युवक युवती पालकांनी या शैक्षणिक स्पर्धेत सहभागी होऊन परम पूज्य गुरूमाऊलींचे अभिष्टचिंतन मोठ्या उत्साहात शैक्षणिक स्पर्धा उपक्रमातून संस्कारातून शिक्षण, चारित्र्य निर्माण व राष्ट्रनिर्माण होण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे नांदेड जिल्हा बालसंस्कार व युवाप्रबोधन विभाग दिंडोरीप्रणित सेवा मार्ग, स्वामी समर्थ सेवा केंद्र मुखेडच्या वतीने  करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी