मुंबई। सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या सतरा किलोमीटर च्या रस्त्यासाठी विषेश बाब म्हणुन निधी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या .
सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या सतरा किलोमीटर रस्त्याच्या प्रश्नावर नागरीकांनी सातत्याने आंदोलन चालवले होते. या आंदोलनाची विषेश दखल घेऊन मा.जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी या रस्त्याच्या निधी साठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदाकाठच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.
याची माध्यमातून मोठी चर्चा झाल्यानंतर या प्रश्नांची गंभीर दखल शासन दरबारी घेण्यात आली .या साठी राजेश विटेकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी विषेश बाब म्हणुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली त्यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना या सतरा किलोमीटर च्या रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गोदाकाठच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने रस्ता येत्या मार्च पर्यंत रस्त्याच्या कामास सुरुवात होईल अशी माहिती राजेश विटेकर यांनी दिली. या वेळेस त्यांच्या सोबत सुधीर बिंदू,श्रीराम भंडारे, पंकज आंबेगावकर, माधव जाधव,पत्रकार सुभाष सुरवसे व गणेश पाटील हे उपस्थित होते.
