हदगाव, शे चांदपाशा| भविष्यात जर वेळ आली तर स्वबळावर पुढील निवडणूका लढु शिवसैनिक सदैव तयार असतात. आम्ही शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरे यांचे आदेश पाळणारे सैनिक आहोत असे उदगार शिवसेनेचे माजी आ नागेश पा. आष्टीकर यांनी केलं.
ते हदगाव शहरात झालेल्या शिवसंपर्क अभियान दरम्यान पञकाराशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटेसह तालुक्यातील सेनेचे तालुका प्रमुख, शहरप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते हे हजर होते. सेनेचे माजी आ नागेश पा. आष्टीकर पुढे म्हणाले की, जर हदगाव विधानसभा क्षेञात भविष्यकाळात शिवसेनेला एकटे निवडणूका लढण्याची प्रसंग आली. तर आम्ही शिवसैनिक सदैव तयार असतो. स्वबळावर ही शिवसेना निवडणूक लढवु शकते. यापुर्वी पण स्वबळावर निवडणूका लढविल्याचे त्यांनी सागितले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे राज्य उत्तम प्रकारे चालवत आहे. शासनाच्या विविध योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना पोहचत आहे की, नाही तसेच शेतक-याना आतिवृष्टीचे अनुदान मिळते. कृषि अधिकारी तहसिलदार तसेच जिल्हाधिक-याचे अहवाल असल्यावर ही पीक विमा मिळत नाही. केवळ मोर्चा काढुन काहीच उपयोग नाही. प्रत्यक्षात कृति केली पाहीजे पिकविम्या करिता राज्यस्तरावरुन प्रयत्न सुरु असल्याचेही त्यानी एका प्रश्नांच्या वेळी सागितले. हे शिवसंपर्क अभियान शिवसेनेत नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी असून, गेल्या दोन वर्षापासुन कोरोणामुळे शिवसैनिकात गाठीभेटी होत नाहीत. आता कुठं कोरोणा कमी झाल्यामुळे हे शिवसंपर्क अभियान सुरु असल्याचे त्यांनी सागितले.
