सवना गावात भाजपच्या कार्यकर्त्याने अवैद्य दारूविक्रेत्यास पकडले -NNL

महिला व युवकांचा मदतीने केला साठा पोलिसांच्या स्वाधीन; आरोपी झाला फरार  


हिमायतनगर|
सवना ज येथील भाजप युवा मोर्चाचे प्रमोद भुसाळे यांनी पुढाकार घेऊन गावात अवैद्य दारू विक्री करणाऱ्याकडून एक बॉक्स दारू पकडून दिले आहे. १९ च्या रात्री10 वाजता पोलिसांना पाचारण केल्यानंतर ही कार्यवाही झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील सवना, वाशी, रमनवाडी, आंदेगावं, खैरगाव आदी ठिकाणांहून दारू बंदी विरोधात लढा सुरू झाला आहे. त्यांचाच हा एक भाग असुन, पोलीस प्रशासनाने आगमी सण उत्सव काळात दारूमुळे गावागावात भांडण तंटे निर्माण होणार नाही यासाठी पुढाकार घेतला असून, यापुढे दारूचा आवैद्य धंदा चालू देणार नाही असे आश्वासन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी नागरिकांना दिलं आहे. 



त्याच धर्तीवर सवना (ज) येथे सायंकाळी पोलीस जमादार कागणे यांनी गावातील विक्रेत्यांना दारूचा धंदा बंद झाला पाहिजे नाहीतर कार्यवाही होईल अश्या सूचना दिल्या होती. त्यानंतरही हिमायतनगर शहरातील परवानाधारक दारू विक्रेत्याकडून दारूचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा करताना दुचाकीस्वार हे गावच्या बाहेर एका संकेत स्थळ असलेल्या झाडाखाली खताच्या पोत्यात दारूच्या बॉक्स ठेवल्या जातो. आणि तेथून येथील दारू विक्रेता रात्रीच्या वेळी हा माल आपल्या घरी देऊन विक्री करतो. 


हि बाब येथील तरुण भाजपा युवा मोर्चाचे सर्कल अध्यक्ष युवक प्रमोद भुसाळे यास समजली आणि तो त्या विक्रेत्याच्या पाळतीवर होता, रात्रीला दहा वाजता मारुती वानखेडे हा पोत्यात बांधलेला दारूचा बॉक्स घेऊन येत असताना महिलां व गावातील युवकांच्या मदतीने त्यास रंगेहात पकडल मात्र पोलिसाच्या स्वाधीन करण्यापूर्वी तो फरार झाला आहे. याकामी त्यास सवना नगरीचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष योगेश दादा अनगुलवार, रामदास अनगुलवार, कुष्णा बीरकलवार, विठ्ठल कल्याणे, बाबाराव अक्कलवाड यांनी सहकार्य केलं. मात्र पोलिसांना बोलावंतांचा दारू विक्रेता फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी साठा जप्त करून कार्यवाही केली असल्याचे भुसाळे यांनी सांगितले आहे.

पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या सूचनेने जमादार बालाजी लक्षटवार, डीएसबीचे कुलकर्णी यांनी येथे दाखल होऊन मारुती उत्‍तम वानखेडे यांच्याकडून ४८ दारूच्या बॉटल १८० एम एल असा प्रत्येकी ६० रुपये किमती प्रमाणे २८८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. हिमायतनगर पोलिस स्थानकात याबाबत नोंद करण्यात आली असून, या घटनेचा तपास महिला पोलिस जमादार करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी