हिमायतनगर| भारतीय भटक्या-विमुक्त जाती जमाती विकास संघटना महाराष्ट्र यासामाजीक संघटने कडुन तालुका, जिल्हा कार्यकारीनीचे नियुक्तीपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले यात नांदेड जिल्हयातील किनवट हिमायतनगर भोकर हदगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचााा समावेश होता ही बैठक तालुक्यातील वटकळी येथे घेण्यात आली.
भटक्या विमुक्त जाती जमाती च्या विविध समस्या सामाजिक व घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संघटना काम करत असते गावपातळीपर्यंत संघटनेचे पदाधिकारी असावेत या हेतूने संघटनेच्या पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भारतीय भटक्या-विमुक्त जाती जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सुधीर अनवले लातुर यांच्या आदेशानुसार मराठवाडा नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आल.
वटफळी ता, हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात मराठवाडा उपाध्यक्ष देविदास हादवे वसमत, मराठवाडा प्रशिध्दी प्रमुख शिवाजीराव चव्हाण, मसनजोगी समाज संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण घनसरवाड, जिल्हा कार्याध्यक्ष रमेशजी कुंभारे, जिल्हा सचिव दताजी ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आदवाडे, जिल्हा सहसचिव नितीन घोगरे, किनवट ता. अध्यक्ष सचिन सातपुते, भोकर ता. अध्यक्ष लक्ष्मन चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघटन मजबूत करण्यासाठी प्रर्यत्न करण्यात येणार आहे ह्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन मराठवाडा उपाध्यक्ष देविदास हादवे वसमत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व समाजातील एका जातीच्या आधारावर काहीहोणार नाही सर्व समाज संघटना एकत्र आल्या तर पुढील पिढीला न्याय मिळेल अन्यथा काही होणार नाही असे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी भटक्या विमुक्त जाती-जमातीतील स्त्रि पुरुष हजर होते.

