हिमायतनगर,अनिल नाईक| अच्छे दिनाचे गाजर दाखवीत केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सारख्या इंधनाचे दार गगनाला भिडविले आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असून, परिणामी सर्व सामन्यांचे कंबरडे मोडले जात आहे. अगोदरच देशावर कोरोना महामारीचे संकट यात महागाईचा भडका यामुळे देश अधोगतीला जात आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारून सर्व सामन्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महागाई कमी करावी अन्यथा एक दिवस मोदी सरकारला पायउतार व्हावे लागेल अश्या शब्दात शहरातून पेट्रोल पंपापर्यंत काढण्यात आलेल्या सायकल व बैलगाडी मोर्चातून निषेध करण्यात आला आहे.
आज दि.१६ जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने हिमायतनगर शहरातील काँग्रेस कार्यालयापासून ते पेट्रोल पंपापर्यंत सायकल व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत वारे मोदी तेरा खेल... सस्ती दारू महंगा तेल... अश्या घोषणा देत महागाईच्या विरोधात निषेध राहिली काढली. हि रैली नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण,माजी खा.सुभाष वानखेडे, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी सांगितले. यावेळी रफिक सेठ, सुभाष राठोड, जनार्धन तांडेवाड, गणेश शिंदे, रामराव सूर्यवंशी, परमेश्वर गोपतवाड, संजय माने, अखिल भाई, शिवाजी पाटील वाघीकर, गोविंद बंडेवार, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.