शिवसेनेच्या संपर्क अभियानासाठी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई १८ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात -NNL

तर संपर्क प्रमुख आनंदराव जाधव १८ ते २२ नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात


नांदेड, अनिल मादसवार| शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्ह्यात शिवसेना संपर्क अभियान उत्साहाच्या वातावरणात राबविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिली आहे.

राज्यात १२ जुलैपासून सबंध महाराष्ट्रात शिवसेना संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत गावपातळीवर जावून शिवसेना पक्षाची बांधणी करणे, नाव नोंदणी करणे, गट,गण निहाय असलेल्या कार्यकत्र्यांशी संवाद साधणे, जनतेच्या असलेल्या विविध तक्रारी मागवून घेवून त्याचा निपटारा करणे, असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. 

याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दि.१८ जुलै रोजी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई हे हिंगोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ जुलै रोजी हिंगोली शहरात त्यांचे आगमन होईल. त्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा हिंगोली शहरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील विविध गावात ना.शंभुराजे देसाई हे भेटी देणार असून, गावपातळीवर शिवसेनेची बांधणी करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. १८ जुलै रोजी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देवून शिवसैनिकांशी ते संवाद साधतील. त्यानंतर ते वाशिमकडे रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्या समवेत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार सुभाष साबणे हे सोबत असतील.

त्यानंतर १९ ते २२ जुलैपर्यंत शिवसेनेचे नांदेड, हिंगोली, बीड जिल्हा संपर्क प्रमुख नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध गट आणि गणात बैठका, कार्यकत्र्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंढे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार सुभाष साबणे तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडी  व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. 

१९ ते २२ जुलैचा नांदेड जिल्ह्याचा दौऱ्याचा कार्यक्रम कार्यकत्र्यांना स्थानिक पातळीवर कळविण्यात येणार असून, त्यासाठी आजपासूनच नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव या सर्व दौऱ्याची आखणी करत असून, या दरम्यान गावपातळीवर शिवसेनेच्या बांधणीसोबत पक्षाचे कार्य वाढविणे, त्या भागात शेतकरी, युवक व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव करुन घेणे, प्रसंगी वेळीच तक्रारीचा निपटारा करणे, ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटी, कोरोनामुळे निधन झालेल्या कुटुंबियांच्या भेटी, राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या अडचणी व त्यांचा निपटारा, मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांशी संपर्क असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे आनंदराव जाधव यांनी सांगितले.

 या सर्व दौऱ्यात हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर हेही उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंढे यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी