बुधवारी भर बाजारातून ट्रैक्टरद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याचे चित्र
हिमायतनगर, अनिल नाईक| शहर व ग्रामीण भागात रेतीचा गोरखधंदा थांबता थांबत नाही उन्हाळा, हिवाळा या धंद्याने पैनगंगेची अब्रू विदेशीला टांगली, आता साठेबाजी केलेल्या रेतीची वाहतूक व चढ्या दराने विक्री राजरोसपणे सुरु आहे. असे असताना देखील महसुलाचे अधिकारी कर्मचारी मूग गिळून गप्प असल्याने या रेतीच्या धंद्यामध्ये यांची पार्टनरशिप आहे कि काय..? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
मागील महिन्यात विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या कामारी, पिंपरी, दिघी, विरसनी, घारापुर, रेणापूर, कोपरा, पळसपूर, सिरपल्ली, डोल्हारी, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी आदी ठिकाणच्या नदी, नाल्याच्या रेती धक्क्यावरून राजकीय वरद हस्त असलेल्या रेतीचोरानी महसुलाचे त्या-त्या सज्जाचे संबंधित नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, काही पोलीस पाटील व सरपंचांना हाताशी धरून जेसीबी व मजुरांच्या साहाय्याने रात्रंदिवस रेतीचे उत्खनन करून लाखो ब्रास रेती चोरून विक्री केली आहे.
एवढेच नाहीतर नाहीतर पावसाळा तोंडावर आल्याने हजारो रेतीची साठेबाजी करून सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे. आणि गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून अल्पावधीत मालामाल होण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी हस्तांदोलन करून रेतीचा कधी नव्हे तेवढा अमाप उपसा यावर्षी शेकडो ट्रैक्टर, टिप्पर चालक - मालकाने ठिक ठिकाणी मनुष्यबळ तैनात करून केला होता. त्याचा साठ्यातून आता हळूहळू रेतीची वाहतूक करून जादा दराने विक्री करण्याचा धंदा सुरु आहे. याचे चित्र आज बुधवारी भर बाजारातून ट्रैक्टरद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याचे चित्र दिसुन आल्याने पुन्हा रेतीच्या चोरट्या धंदयांची चर्चा शहरासह तालुकाभरात सुरु झाली आहे. महसूल विभाग डोळे असून आंधळ्याची भूमिका कितीदिवस घेणार असा प्रश्न सुजाण व पर्यावरण प्रेमी नागरी विचारीत आहेत.
