शेतकऱ्यांना क्रॉप इन्सुरन्स ॲप चालु करुन अडचणी दुर करा – बालाजी पाटील
मुखेड| नांदेड जिल्हयामध्ये झालेल्या ढगफुटी व अतिवृष्ठीमुळे शेतीचे व पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हयातील शेतकरी इफको टोकीयो पिक विमा कंपनीकडे तक्रार करीत असुन तक्रार करण्याचे क्रॉप इन्सुरन्स हे ॲप चालत नसुन त्या मोबाईल ॲपवरील सर्व अडचणी दुर करुन त्यातील अडचणी बाजुला काढुन ते ॲप तक्रार करण्यासाठी शेतकरी बांधवासाठी लवकरात लवकर चालु करावे अशी मागणी बालाजी पाटील ढोसणे यांनी राज्याचे कृषि आयुक्त धिरजकुमार यांच्याकडे ईमेल दवारे केली.
नांदेड जिल्हयातील यंदाचे खरीप हंगाम इफको टोकीयो पिक विमा कंपनीकडे असुन जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात ढगफुटी व अतिवृष्ठी झाल्याने पिकाचे नुकसान झाल्याचे ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे कळवावे लागते. त्यासाठी मुखेड तालुक्यासह जिल्हयातील सर्व शेतकरी बांधव क्रॉप इन्सुरन्स हया ॲपवर तक्रार करण्यासाठी जात असता पिक विमा भरलेल्या पावतीचा क्रमांक च वैध नसल्याचे दाखवत असुन २०२१ साठी ते ॲप आणखी कार्यान्वीत झाले नसल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुळे ७२ तासात कंपनीकडे तक्रार जात नसुन यामुळे बऱ्याच शेतकरी पिकांचे नुकसान होवुनही पिक विम्यापासुन वंचीत राहत असल्याने पिक विमा कंपनीकडे तक्रार नोंदविण्यासाठी मुदतवाढ दयावी. पिक विमा भरण्याची शेवटची मुदत ही १५ जुलै असल्याने बरेच शेतकरी बांधव विमा भरत असल्याची माहीती बालाजी पाटील ढोसणे यांनी निवेदनादवारे कळविली आहे. गेल्या वर्षी पण मोठी ढगफुटी व अतिवृष्ठी होवुनही शेतकऱ्यांना पिक विम्यापासुन वंचीत रहावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यात प्रंचड संताप असुन त्यासाठी तात्काळ तक्रार नोंदविण्यासाठी क्रॉप इन्सुरन्स हे ॲप सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी मागणी बालाजी पाटील ढोसणे यांनी केली.