रमणवाडी तांडा येथे दारूविक्री करनाऱ्याच्या दुकानावर महिला, पुरुषांचा घेराव - NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

दारूविक्री बंद झाली नाहीतर पोलीस स्टेशनला तक्रार करू असा इशारा  



हिमायतनगर,अनिल नाईकसवना ज, वाशी पाठोपाठ आता रमणवाडी येथील महिला - पुरुषांनी दारूबंदीच्या विरोधात एल्गार पुकारला असून, आज येथील गावकर्यांनी राजरोसपणे गावात दारू विकृत वातावरण दूषित करणाऱ्याच्या दुकानावर धडक देऊन घेराव घातला. तसेच तात्काळ दारूविक्री बंद करा अन्यथा पोलिसात तक्रार देऊन बड्या ठोकायला लावू असा इशारा दिला आहे. 


तालुक्यातील रमणवाडी तांडा येथे किराणा दुकानावर देशी दारू विक्री करण्यात येते. तर काही घरी गावठी मोहाची दारू विक्री होते. तांड्यात दारू विक्रीचे चार दुकाने आहेत. सवना (ज), एकघरी, वाशी, जीरोना, महादापूर, गणेशवाडी यासह काही गावातून दारू पिण्यासाठी लोक रमणवाडी येथे येतात. त्यामुळे गावातील तरुण पिढी बिघडत असून, व्यसनाधीन होत आहे. तांड्यावरील दारूविक्री बंद झाली पाहिजे यासाठी दारू विक्री करणाऱ्याच्या दुकानाला महिला व पुरुषांनी आज घेराव घातला. तांड्यावरील दारूविक्री बंद करा अन्यथा पोलीस स्टेशनला सामुहिक तक्रार करण्यात येईल असा सज्जड दम दिला आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, रात्रीतून पोलीस विभागाचे पथक येथे धडक देऊन कार्यवाही करतील अशी अपेक्षा गावकर्यांनी व्यक्त केली आहे. 


मागील १५ दिवसापूर्वी सवना (ज), वाशी येथील जागृत महिलांनी पोलीस स्टेशन गाठून दारूबंदीचे निवेदन दिले. पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकते, कोमल कागणे, नितीन राठोड यांनी दारूविक्री बंद केली. मात्र रमणवाडी तांडा येथिल छोट्या तांड्यात दारूची चार दुकाने असून, या ठिकाणी दारू विक्री होते आहे. त्यामुळे येथे पाच ते सात गावचे दारुडे दारू पिण्यासाठी येतात ही बाब गंभीर आहे. रमनवाडी तांडा येथे किराणा दुकानावर दारूविक्री दिवसाढवळ्या होते. मोहाची गावठी दारू घरी विक्री होते असे रमनवाडी तांड्याच्या नागरिकांनी सांगितले. या दारूमुळे तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत.   


दारूच्या नशेत तर्रर्र झाल्यानंतर युवक व मजुरदार शेतात कामाला जात नाहीत. घरी दारू पिऊन महिलांना त्रास देतात, महिलांसह पुरुषाने दारूविक्री बंद व्हावी म्हणून आज दारू विक्रेत्याला घेराव घातला आणि सज्जड दम देऊन पोलीस स्टेशनला तक्रार करू असा इशारा बाबू जाधव, गोविंद जाधव, गजानन आडे, किशोर जाधव, गणेश आडे, विलास जाधव, अविनाश जाधव, भीमराव जाधव, सुरेखा राठोड ,शेवंताबाई जाधव, यशोदा जाधव, गंमाबाई जाधव, आदि समूहांनी सांगितले. दारूबंदी नाही केल्यास सामूहिक तक्रारीचे निवेदन पोलीस स्टेशनला देणार असल्याचे यावेळी नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सर्वांनी सांगितले. 


बीट जमादार कोमल कांगने यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या सवना (ज), वाशी व इतर गावची आम्ही दारूबंदी केली आहे. रमणवाडीला आज रात्रीला धाड टाकून दारू विक्री करणाऱ्याला पकडणार असल्याचे सांगितले.

 

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post