पैरालिसीसमुळे अपंगत्व आलेले वयोवृद्ध गणपत शामराव गादेवार व त्यांच्या दोन मुलीनि पत्रकारांना याबाबतची माहिती दिली
नांदेड| किनवट तालुक्यातील बोधडी येथील रहिवासी असलेले अपंग वयोवृद्ध गणपत शामराव गादेवार यांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा बोधडी ( बु) मध्ये बचत खाते आहे. या खात्या मधुन एक लाख रुपये परस्पर काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. गादेवार यांच्या घरा जवळच राहणारा सिद्धु उर्फ सिद्धीविनायक सुधाकर डोंगरे यांनी ए. टी. एम चोरून नेले आणि ठिकठिकाणी एटीएम मधून रक्कम काढून घेतली आहे.रक्कम काढून नेणारे तिघेही जण गादेवार यांच्या शेजारी राहत असल्याने ते त्याला आपल्या मुलासारखे समजायचे व कधी कधी पैसे काढण्यासाठी सोबत नेत आसत. त्यामुळे गणपत गादेवार यांच्या ए. टी. एम चा नंबर माहिती असल्याने दि. १२ में ते २३ में २०२१ च्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या निमाबाई सुधाकर डोंगरे, सुधाकर डोंगरे, त्यांचा मुलगा सिद्धिविनायक सुधाकर डोंगरे सर्व रा.बोधडी यांनी पैसे सहजपणे काढून घेतल्याचे उघडकीस आले. पण किनवट येथील पोलीस निरीक्षकाना फिर्याद देऊन सुध्दा आरोपीवर कार्यवाही करण्यात येत नसल्याचे गणपत शामराव गादेवार यांनी सांगितले आहे.
त्यानंतर मुंबई येथून त्यांची दोन्ही मुली घरी आल्यानन्तर त्यांनी पॉलिसीची भेट घेतली आणि आता याबाबत कलम ४०६,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. मात्र यातही पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप अपंग गादेवार यांच्या मुलींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच आरोपींने किनवट, हिमायतनगर, भोकर सारख्या ठिकाणाहून रक्कम उचलली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, तात्काळ आरोपीना अटक करून अपंग व्यक्तीचा गैरफायदा घेऊन रक्कम चोरल्या प्रकरणी कार्यवाही करावी आणि न्याय मिळून द्यावा अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
