कोसमेट येथील नाल्यामध्ये एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला -NNL

किनवट, गौतम कांबळे| 17 जुलै 2021 शनिवार रोजी सुभाष गड्डमवाड हा शेतकरी शेताकडे जाऊन येतो म्हणून शेताकडे गेला असता तो घराकडे परत आलाच नाही. तब्बल दोन दिवसांनी सुभाष गड्डमवाड या शेतकऱ्याचा मृतदेह कोसमेट येथील नाल्यामध्ये दिनांक 19 जुलै 2021सोमवार रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मिळून आल्याची घटना घडली आहे.

कोसमेट येथील सुभाष ईरप्‍पा गडमवाड वय 45 वर्ष हा शेतकरी शेताकडे जाऊन येतो. म्हणून घरामधून निघून गेला होता पण तो घरी परतला नसल्याने गेल्या दोन दिवसापासून त्याच्या नातेवाईकांनी शेताकडे शोधाशोध केली. आणि १७ जुलै २०२१ रोजी चांगलाच पाऊस झाल्याने नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला की काय..? अशी शंका निर्माण झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी नदी-नाले पाहण्याला सुरुवात केली. दरम्यान दिनांक 19 जुलै 2021 सोमवार रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह कोसमेट येथील नाल्यामध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे.


सदरील घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांनी ईस्लापुर पोलीस कळवताच ईस्लापुर ठाण्याचे सहाय्यक पोलीस  निरीक्षक शंकर डेडवाल यांनी पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत व पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच सुभाष ईरप्पा गडमवाड, यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ईस्लापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी के पी गायकवाड यांच्या ताब्यात दिल्याने या मृतदेहाचे शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

सदरील कुटूंबातील एकमेव करता शेतकरी असल्याने त्याच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे. अशी माहिती येथील माजी सरपंच प्रतिनिधी राजू म्याकलवाड व उपसरपंच बंकलवाड  यांनी माहिती दिली आहे. इस्लापूर पोलीस ठाण्यामध्ये अक्समीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत व पोलीस जमादार पोटे हे करित आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी