लोहा| जिल्ह्याच्या राजकारणात गेली तीस - पस्तीस वर्षा पासून सक्रिय असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी आपल्या जुन्या निष्ठावंत सहकाऱ्यांची लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघावर वर्णी लावली आहे. अंबादास देशमुख (जवळा) दिंगबर सोनवळे (देऊळगाव) शरद गुरु जोशी,प्रदीपसिह परिहार यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोहा तालुका खरेदी विक्री संघाचे प्रशासकीय मंडळी यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.आ श्यामसुंदर शिंदे यांचे समर्थक स्वप्नील मनोहर पाटील उमरेकर हे प्रशासकीय सभापती आहेत.राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे.आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी पदभार घेलत्या नंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली.मागील महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा झाला त्यात हरिहरराव भोसीकर यांच्या पक्ष संघटन व नियोजनाची पक्ष नेतृत्वाने दखल तर घेतलीच शिवाय भोसिकरांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारली.
त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात भोसीकर यांनी त्यांचे जुने निष्ठावंत सहकारी याना खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून नियुक्त केले. यात पक्षाचे जिल्हा सचिव अंबादास मोरे देशमुख( जवळा दे), जिल्हा सचिव दिगंबर सोनवळे( देऊळगाव),प्रदीपसिह परिहार( माळाकोळी), जिल्हा संघटक शरद गुरू जोशी( सोनखेड) या चार कार्यकर्त्यांची प्रशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र लोहा तालुका सहकारी संस्थेचे सहायक निबंधक के.बी फस्के यांनी दिले आहे .या नियुक्ती बद्दल या चारही नवनियुक्त संचालकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह पक्ष नेत्यांचे आभार मानले आहेत. या सर्वांचे मित्रपरिवार व पक्षातील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
